पुण्यात कालव्यात बूडून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा उजवा मुठा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथे सोमवारी दुपारी घडली.

शुभम गणेश राऊत (वय ११,रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे मुलाचे नाव आहे. याप्रकऱणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हडपसर मधील एका शाळेत इयत्ता ५ वी मध्ये शिकण्यास होता. तो मित्रांबरोबर दररोज कालव्यात पोहायला जात होता. दरम्यान तो रोजच्या प्रमाणे कालव्या पोहण्यासाठी गेला होता. तेव्हा सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास काही वेळ पोहल्यानंतर त्याला दम लागला. आणि तो पाण्यात बुडु लागला. हा प्रकार पोहणाऱ् मुलांना लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते हसमुखसिंग जुनी यांनी पाण्यात उडी मारुन शुभमला बाहेर काढले. शुभम बेशुध्दावस्थेत होता. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.