छंद म्हणून सुरुवात, अन् बनवला स्वतःचा ब्रॅण्ड, व्यवसायाची झाली भरभराट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – जुळ्या बहिनीनी ( twin sister) केवळ छंद म्हणून जोपासलेली बेकरी प्रॉडक्ट्स (Bakery Products) तयार करण्याची कला आज त्यांच्या कमाईचे आणि सन्मानाचे माध्यम बनली आहे. नागपूरातील इशिता आणि सान्या चड्डा या जुळ्या बहिणींनी केवळ वयाच्या अकराव्या वर्षापासून स्टार्टअप करून अनेकांना आर्श्चयाचा धक्का दिला आहे. कुकिंगमध्ये आवड असणा-या इशिता आणि सान्या चढ्या यांनी वयाच्या आठव्या वर्षीच स्वयंपाक शिकून घेतला. केवळ छंद म्हणून त्या बेकरी प्रॉडक्ट्स तयार करून लागल्या, मात्र, कधी याचा व्यवसाय करून त्यातून पैसे कमाविता येईल असे कधीही त्यांच्या ध्यानीमनी आले नाही. मात्र, आयुष्याने यु-टर्न घेतला अन् व्यवसायाला सुरुवात झाली.

रामनगर येथील फूड पार्क येथील ‘एक्झीबिशन’ मध्ये इशिता आणि सान्याने स्टॉल लावून आपले बेकरी प्रॉडक्ट्स विक्रीला ठेवले होते. स्टॉल्समध्ये ठेवलेल्या विविध प्रॉडक्ट्सची चव भन्नाट असल्याने सर्वांनी त्यांचे कौतुकही केले. तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात स्टॉल लावण्यास सुरुवात केली. त्यांच्या बेकरी, केक आणि बेक फूड या खाद्यपदार्थ्यांना बरीच मागणी वाढली. यातूनच बेकरी प्रॉडक्ट्स विक्री करण्याचा व्यवसाय करून त्यातून बऱ्यापैकी ‘अर्निंग’ मिळविता येईल असा एक विचार मनात डोकावला.

छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करून आलेल्या ऑर्डरनुसार केक, कुकीज आणि बरेच प्रॉडक्टस तयार करून देण्यास सुरुवात झाली. छोटे-छोटे कुकिंग क्लासेस करीत नवनवे पदार्थ तयार करू लागले. यानंतर काही मोजके पदार्थ कसे तयार करायचे यासाठी बंगरुळ येथून विशेष प्रशिक्षण घेतले. पुढे या वाटचालीतून त्यांनी स्वतःचा ब्रॅण्ड विकसित करीत, व्यवसायाला सुरुवात केली.आज त्यांनी तयार केलेल्या प्रॉडक्ट्सला ऑनलाईन बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही विशेष पदार्थ त्यांची ओळख बनली आहे. हे पदार्थ नागपुरात केवळ इशिता आणि सान्याच तयार करू शकतात. नागरिक ऑर्डर नोंदवित आवडीने खाद्यपदार्थ मागवितात. यासाठी त्यांना आई संध्या आणि वडील डॉ. विशाल चड्डा यांची मोठी मदत झाली आहे.

अभ्यासातही हुशार
कुकिंग करीत असताना इशिता आणि सान्या चढ्ढा यांनी आपल्या अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. व्यवसायाप्रमाणेच आपल्या अभ्यासात त्यांनी नेहमी टॉप केले. सेंटर पॉईट शाळेत शिकताना व्यवसाय आणि शिक्षणाचा समतोल साधत दहावीच्या निकालात इशिताने 97.8 टक्के तर सान्याने 97 टक्के मिळवीत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे