एल्गार परिषद प्रकरण : NIA ची मुंबईच्या विशेष न्यायालयात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषदेचा तपास राज्य शासनाने आपल्याकडे द्यावा, यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांनी मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेऊन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने हा गुन्हा एनआयएने हस्तांतरीत केल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी मुंबईत नवीन एफआयआर दाखल केला आहे. एनआयएच्या अर्जावर न्यायालयाने सोमवारी सुनावणी ठेवली आहे.

राज्यात भाजपाची सत्ता जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शरद पवार यांनी एल्गार परिषदेचा पुणे पोलिसांकडून केलेल्या तपासाची एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तातडीने केंद्र सरकारने एल्गारचा तपास एनआयएकडे सोपविला. यावरुन केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात संघर्ष पेटला आहे.

सोमवारी एनआयएचे पथक पुणे पोलीस आयुक्तालयात आले होते. त्यांनी या गुन्ह्याचा तपास ताब्यात देण्याची मागणी केली होती. मात्र, आपल्याला पोलीस महासंचालकांकडून त्याबाबतचे आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही तपास हस्तांतरीत करुन शकत नाही, असे एनआयएच्या पथकाला उत्तर दिले होते. त्यानंतर एनआयएने मुंबईतील न्यायालयात धाव घेऊन तपास ताब्यात देण्याविषयी अर्ज सादर केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा