‘त्या’ पाच जणांची स्थानबद्धता कायम, सर्वोच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांनी कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा अशा पाच जणांवर कारवाई केली. या पाचही जणांची स्थानबद्धता कायम राहणार आहे. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या पाच जणांच्या सुटकेची मागणी रोमिला थापर आणि इतर काही जणांनी केली आहे. यावर न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर आणि इतरांनी या पाच कार्यकर्त्यांच्या अटकेची स्वतंत्र चौकशी करून त्यांची तातडीने सुटका करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. रोमिला थापर, अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक, देवकी जैन, समाजशास्त्राचे प्राध्यापक सतीश देशपांडे आणि मानवी हक्क वकील माजा दारुवाला यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायदा आणि विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती. या पाचही आरोपींचा नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’28e54e63-bcbc-11e8-b8e0-eba0d9fd3a26′]

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी गृहकैदेत असलेल्या पाच कार्यकर्त्यांविरोधात पुणे पोलिसांनी बनावट पुरावे तयार केल्याचे आढळल्यास या प्रकाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले होते.

पाचही कार्यकर्त्यांवरील कारवाई योग्य असल्याने त्यांना आपल्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी करीत राज्य सरकारने पोलिसांनी सादर केलेले पुरावे तपासावेत, अशी विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानंतर, त्यात काही वावगे आढळल्यास विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

[amazon_link asins=’B07G5BTYC2,B07GLS2TRR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32b70a4d-bcbc-11e8-8e17-5b0fb6a3c5fd’]