‘एल्गार’चा तपासाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा पण….

राज्य सरकारने तपास केंद्राकडे देणे त्यापेक्षा योग्य नाही शरद पवार आपल्या मतावर ठाम

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन  – एल्गार तपासाचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. केंद्र सरकारने तपास काढून घेणे योग्य नाही आणि राज्य सरकारने तपास केंद्राकडे देणे त्यापेक्षा योग्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापूर येथील एका कार्यक्रमाअगोदर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

एल्गार परिषद तपासाची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित फाईलवर एसआयटी नेमण्याची शिफारस केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ती अमान्य केली. एल्गारचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी घेतला.
एल्गार परिषद तपासाबाबत शरद पवार यांनी सांगितले की, एल्गारचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्यांविषयी जैन समाजातून विरोध करण्यात आला होता.

एल्गारच्या तपासाबाबत मुंबईत सकाळी ९ ते ११ बैठक झाली आणि दुपारी ३ वाजता केंद्र सरकारने आदेश काढून हा तपास आपल्याकडे घेतला. राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवणे हा राज्य शासनाचा अधिकार आहे. त्यामुळे केंद्राने अशा प्रकारे तपास काढून घेणे योग्य नाही आणि राज्य सरकारने तपास केंद्राकडे देणे त्यापेक्षा योग्य नाही. सीएए विषयी बोलताना शरद म्हणाले की, या कायद्यामुळे मागासवर्गीयांनाही त्रास होणार आहे. मात्र, मुस्लिम समाजाने अधिक जागरुकता दाखविली.

You might also like