पोटदुखीमुळं झाला ‘अ‍ॅडमिट’, ‘सिटी स्कॅन’चा रिपोर्ट बघून डॉक्टरच हादरले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात हरियाणामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने गांजाच्या नशेत २० सेमी लांबीचा चाकू गिळला होता. तब्बल, दीड महिना ही व्यक्ती गप्प बसली. मात्र, त्यानंतर पोटात दुखायला सुरुवात झाल्याने त्याला एम्समध्ये (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हरियाणातील पलवल येथील राहणारा हा २८ वर्षीय तरुण व्यसनाचा शिकार झाला झाला होता. तो अनेक वर्षांपासून गांजा पित असल्याने त्याला सायकोसिस नावाचा आजार जडला होता. पण त्यावरती त्याने उपचार घेतले नाही. ज्या व्यक्तींना सायकोसिस झाला आहे, अशा व्यक्ती चमचे अथवा पीन गिळत असतात, मात्र अशा प्रकारे चाकू गिळणे हा प्रकार पहिल्यादांच घडला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

या तरुणाला पहिल्यांदा ताप आणि पोटात दुखू लागल्याने तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याला स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले. तिथे त्याचा एक्स-रे काढण्यात आल्यानंतर त्याच्या पोटात सुमारे २० से. मी लांब चाकू असल्याचे निष्पन्न झाले. हे पाहून डॉक्टर सुद्धा हैराण झाले. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्याला AIIMS रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मग कुटुंबीयांनी त्याला AIIMS मध्ये दाखल केले.

यकृतात अडकलेला चाकू
याबाबत बोलताना गॅस्ट्रो शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. एनआर दास यांनी म्हटलं की, ज्यावेळी आम्ही तरुणाचा सिटी स्कॅन केले होते. तेव्हा आम्हाला चाकूचा सुमारे १० सेंटीमीटर धारदार भाग यकृतात गेलेला दिसला. चाकूमुळे फुफ्फुस आणि यकृतामध्ये संसर्ग झाला होता. तरुणाच्या हिमोग्लोबिनची पातळी फक्त ६ एवढी होती. तसेच रक्त संक्रमणाची पातळी २२००० पर्यंत होती. फुफ्फुसांमध्ये पाणी झाले होते.

तीन चालली शस्त्रक्रिया
१९ जुलै रोजी या तरुणावर AIIMS मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन तास चालेल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी चाकू सुरक्षितपणे बाहेर काढला. दरम्यान, आता तरुणाची प्रकृती ठीक आहे. यकृतातून चाकू बाहेर काढायचे मोठे आव्हान होते, असे डॉ. दास यांनी सांगितलं. यामध्ये थोडी चूक झाली असती तर तरुणाचा जीव गेला सुद्धा गेला असता. पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तरुणाला लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.