Elle Beauty Awards 2019 : अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ‘या’ लुकवर सारेच ‘फिदा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच मुंबईत एले ब्युटी अवॉर्ड्स 2019 पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी उपस्थिती होते. करीना कपूर खान, जान्हवी कपूर, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा यांच्यासह इतरही कलाकार होते. सर्वच स्टार्स सुंदर दिसत होते. परंतु या सर्वांमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माचा लुक पाहण्यासारखा होता. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अनुष्का खूपच हॉट आणि सुंदर दिसत होती.

काहींनी अनुष्काचा हा ड्रेस खूपच आवडला. परंतु काहींनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिली आहे. असे असले तरी पांढऱ्या रंगाच्या हाय स्लिट वाल्या ऑफ शोल्डर ड्रेसने अनुष्काच्या सौंदर्याला चार चांद लावले हे एवढे मात्र नक्की.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या तिच्याकडे कोणताही सिनेमा नाही. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

 

Visit : Policenama.com