कधी सुपरस्टार तर कधी क्रिकेटमधील स्टारसोबत जोडलं गेलं अभिनेत्री एली अवरामचं नाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार एली अवराम (Elli AvRam) आपल्या लुक आणि हॉटनेससाठी फेमस आहे. एक हॉट आणि बोल्ड अ‍ॅक्ट्रेस म्हणून एली ओळखली जाते. एलीनं अनेक सिनेमांमध्ये आयटम नंबर केलं आहे. एलीचं इंस्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर तरीही तुम्हाला तिच्या हॉटनेसचा अंदाज येईल. कारण तिंच इंस्टा अकाऊंट अनेक बोल्ड फोटोंनी खचाखच भरलं आहे.

एलीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलयाचं झालं तर एली आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्यासोबच्या अफेअरमुळेही ती चर्चेत राहिली आहे. हार्दिकच्या कौंटुबिक कार्यक्रमात एली नेहमीच हजर असायची. परंतु दोघांनी नंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. याशिवाय तिचं नाव बॉलिवूड स्टार सलमान खान आणि मनीष पॉलसोबतही जोडलं गेलं आहे.

एलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2013 आलेल्या मिकी व्हायरस या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय एली किस किस से प्यार करूं, नाम शबाना, बाजार, जबरिया जोडी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. एलीनं सिनेमा आणि अल्बमच्याआधी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत तिनं पहिली अ‍ॅड केली आहे. एली बिग बॉसमध्येही दिसली आहे.

You might also like