‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष ! पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – फेमस हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस एलन पेज (Ellen Page) हिनं लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुषांचं लिंग स्वीकारलं आहे. सोशलवर पोस्ट शेअर करत तिनं याबद्दल माहिती दिली आहे. आता माझं नाव एलन नसून एलियट पेज (Elliot Page) आहे, असंही तिनं सांगितलं आहे. तुम्ही मला स्त्री म्हणा किंवा पुरुष मला फरक पडत नाही. मी तेच केलं जे मला करायचं होतं, असंही ती म्हणाली आहे.

एलन म्हणते, लहानपणापासूनच मला पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आकर्षण होतं. त्यामुळं ट्रान्सजेंडर होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही लोकांना आवडलेला नाही. अनेकांनी माझ्यावर टीका केली. तुम्ही मला पुरुष म्हणा किंवा स्त्री मला काहीही फरक पडत नाही. मी तेच केलं जे मला करायचं होतं. आता लक्षात ठेवा माझं नाव एलन नसून एलियट आहे.

एलन गेली 3 वर्षे एमा पोर्टनर (Emma Portner) सोबत रिलेशनशिपमध्ये होती. अलीकडेच तिनं गर्लफ्रेंड सोबत लग्नही केलं. पत्नीच्या प्रेमाखातर मी लिंगही बदलू शकते असं ती अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. यानंतर आता तिनं हे ऑपरेशन एमासाठीच केल्याचं बोललं जात आहे.

एनलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तिनं एक्स मेन, इ टू द फॉरेस्ट, इन्सेप्शन, जुनो अशा अनेक सुपरहिट हॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. अष्टपैलू अभिनय शैलीमुळं तिनं तिचं एक वेगळं स्थान तयार केलं आहे. परंतु एलन आता अ‍ॅक्ट्रेसच्या भूमिकेत झळकणार नाही. कारण तिनं लिंग बदललं आहे.

You might also like