सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर, 10 महिन्यात 100 अब्ज डॉलरची कमाई

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एलन मस्क त्यांच्या संपत्तीत वाढ झाली असून त्यांनी बिल गेट्स यांनाही मागं टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी फेसबूकच्या मार्क झुकेरबर्ग यांना मागे टाकत SpaceX चे एलन मस्कजगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले होते. Tesla आणि SpaceX चे सीईओ एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. एलन मस्क यांची एकूण संपत्ती १२७.९ अब्ज डॉलर झाली आहे. त्यांचं सध्याचं वय ४९ आहे. एलन मस्क यांची एकूण संपत्ती १२७.९ अब्ज डॉलर झाली आहे. टेस्लाच्या शेअरच्या किमती मोठ्या दराने वाढल्याने एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. एलन मस्क यांनी या वर्षात तब्बल १००.३ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात मध्ये जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर होते. एका वर्षात त्यांच्या कंपनीच्या शेअरची मोठी वाढ झाली असून ते आता जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

बिल गेट्स या यादीत मागील काही दिवसांत दुसऱ्यांदा क्रमवारी घसरली आहे. बिल गेट्स अनेक वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर होते पण २०१७ मध्ये अमेझॉनचे संस्थापक जेफ बिजोस पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर गेले. टेस्लाचे सध्याचे बाजारमूल्य ५०० अब्ज डॉलर आहे. त्यांच्या एकूण संपत्तीपैकी जवळजवळ तीन चतुर्थांश संपत्ती टेस्लाच्या शेअर्स पासून कमावलेली आहे. ज्यांचा स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी काॅर्प किंवा स्पेसएक्समधील त्यांच्या हिस्सेदारी पेक्षा चारपटअधिक हिस्सा आहे.

Bloomberg billionaires index top 10- ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या यादी नुसार जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ॲमेझॉनचे संस्थापक जॅक बिजसे प्रथम क्रमांकावर आहेत. तर भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुख्य आणि ७५. ५ अब्ज डॉलरसह १० व्या क्रमांकावर आहेत. तसेच या यादीत टेस्ला व SpaceX चे सीईओ एलन मस्क, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांचा समावेश आहे.