पुण्यातील मराठमोळ्या इंजिनियरच्या ट्विटला Elon Musk चा ‘रिप्लाय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीच्या टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या एलन मस्क यांनी बिटकॉइन्ससंदर्भात केलेल्या नकारात्मक वक्तव्यामुळे जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याची टीका गुंतवणूकदारांनी केली आहे. सध्या क्रिप्टोकरन्सीसंदर्भात जागतिक बाजारपेठेमध्ये बराच गोंधळ सुरु त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रणय पाटोळे या मराठमोळ्या इंजिनियरने एलन मस्क यांना टॅग करुन काही ट्विट केले होते. त्याला एलन यांनी ट्विटरवरुन रिप्लाय दिलाय.

प्रणयने आपल्या ट्विट मध्ये एलन यांना त्यांच्या तरुण्यामध्येच ऑनलाइन पैशांच्या व्यवहारांसाठी मोठ्या आकाराच्या यंत्रणा उभारण्याची गरज नसल्याचे लक्षात आल्याचं म्हटलं होतं. तसेच सध्या ऑनलाइन माध्यमातून आपण पैसा ज्यापद्धतीने पाठवतो तो बदल घडवून आणण्यामागे एलनचा मोठा हातभार आहे.

क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलनासंदर्भातील तज्ज्ञांना प्रणयने काही प्रश विचारले आहेत. विखारी आणि द्वेष पसरवणारी टीका एलनवर करण्यात आली. हि टीका करणाऱ्या अब्जाधीशांनी स्वत: काय मिळवलं आहे हे क्रिप्टोकरन्सी तज्ज्ञांनी विचारलं पाहिजे असं प्रणयने म्हटलं आहे. दरम्यान एका ट्विट मध्ये प्रणयने एलन यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेल्या बँक ऑफ नेवा सोटीयातील समर इनटर्नशीपसंदर्भात भाष्य केलं आहे. या ठिकाणी जेव्हा एलन काम करत होते त्यावेळी त्यांना १४ अमेरिकन डॉलर दिले जायचे. त्यावेळी त्यांना केवळ बॉसेससमोर आपल्या डोक्यातील भन्नाट कल्पना मांडण्याचे काम होत. या ज्ञानामुळेच एलनने कंपनी स्थापन करण्यासंदर्भातील आपला पाया मजबूत केला. एलनला आपल्या सर्वांपेक्षा चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे कि पैसा कसा काम करतो असही प्रणयने म्हटलं आहे.

एलननेही प्रणयने केलेल्या ट्विटला रिप्लाय दिलाय. त्यामध्ये इनटर्नशीपमुळे त्याला कसा फायदा झाला याबाबत भाष्य केलेल्या एका वृत्तांकनाची लिंक शेअर केली आहे. तसेच एलनने बँक ऑफ नेवा सोटीयामध्ये वरीष्ठ अधिकारी असलेले पीटर निकोल्सन यांच्यासोबत काम करताना आनंद मिळाल्याचंही या ट्विट मध्ये म्हंटल आहे. बँकेला आपण अनेक संकल्पना दिल्या मात्र त्यांनी आपल्या मानधनात वाढ केली नाही अशी खंतही त्यांनी ट्विट मध्ये व्यक्त केली. पीटर यांच्या सोबत काम करताना खूप आनंद मिळाला आहे. काम करत असताना आम्ही एकमेकांना गणिताची कोडी घालायचो. बँकेला भरपूर नफा मिळवून देणाऱ्या संकल्पना दिल्या त्यांनी किमान तासाचा एक डॉलर तरी मला वाढवून द्यायला हवा होता,” असं एलनने म्हटलं आहे.

टेस्लाने वातावरण बदलासंदर्भातील कारण देत बिटकॉइन्समध्ये व्यवहार करणं बंद केलं.एवढेच नाही तर एलनने एका ट्विटरवरील संवादामध्ये कंपनीकडे असणाऱ्या बिटकॉइन्सपैकी काही किंवा सर्व बिटकॉन्सची विक्री केली जाणार असल्याचंही म्हटलं. यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि बिटकॉइन्सचे भाव पडले. त्यानंतर कंपनीने अद्याप एकही बिटकॉइन विकला नसल्याचं एललने ट्विट करुन स्पष्ट केलं. या स्पष्टीकरणाला खूप वेळ झाला होता कारण बिटकॉइन्सचे दर मोठ्याप्रमाणात कोसळल्याने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झाले होते.