Video : मानवांना मंगळावर नेणार्‍या ‘रॉकेट’मध्ये लँडिंग दरम्यान ‘स्फोट’, व्हिडिओ ‘व्हायरल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : स्पेस एक्स रॉकेट ज्याबाबत म्हटले जात होते की पुढील 6 वर्षांच्या आत मानवाला मंगळ ग्रहावर पोहोचवण्याची क्षमता यामध्ये आहे, अशा या रॉकेटचा टेस्ट फ्लाइट लँडिंगच्या दरम्यान स्फोट झाला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लेटेस्ट प्रोटोटाइप रॉकेटमध्ये तीन इंजिन होते. या रॉकेटने अमेरिकेच्या टेक्सासहून संध्याकाळी उड्डाण केले होते. 13 किलोमीटर गेल्यानंतर, ते पुन्हा पृथ्वीवर येऊ लागले आणि या दरम्यान रॉकेटचा स्फोट झाला आणि त्याचे आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले.

या स्टारशिप रॉकेटला प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्कची कंपनी स्पेस एक्स विकसित करत आहे. या रॉकेटचा उद्देश मानवांना मंगळ ग्रह आणि चंद्रावर घेऊन जाणे हा आहे. या व्यतिरिक्त या रॉकेटच्या सहाय्याने 100 टन कार्गोला मंगळ आणि चंद्रावर घेऊन जाण्याचीही योजना आहे. तथापि, हा स्फोट होऊनही एलन मस्क खूप आत्मविश्वासाने भरपूर आहेत आणि आपल्या एका वक्तव्यात ते म्हणाले की, स्पेस एक्सला या चाचणीतून जेवढा डेटा गोळा करायचा होता, तो झाला आहे आणि स्फोट झाल्यानंतरही यास त्यांनी एक यशस्वी प्रयोग असल्याचे म्हटले आहे. येत्या चार ते सहा वर्षांत मानव या रॉकेटच्या सहाय्याने मंगळावर पोहोचू शकेल असा त्यांचा विश्वास आहे.

माजी अवकाश अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की मानव यापूर्वीच मंगळावर पोहोचले आहेत

अधिक माहिती अशी की नासाने स्पेस एक्सला स्टारशिप बनवण्यासाठी 135 मिलियन डॉलर्सचा निधी दिला आहे. याशिवाय अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांची अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिन आणि डायनेमिक्स नावाची कंपनी देखील चंद्र आणि मंगळाशी संबंधित उपक्रमांसाठी पुढच्या दशकात बरेच प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे नुकत्याच एका धक्कादायक दाव्यात इस्रायलच्या एका माजी अवकाश अधिकाऱ्याने असे म्हटले होते की पृथ्वीवर एलियन्स अस्तित्त्वात आहेत आणि गॅलॅक्टिक फेडरेशन प्रोग्राम अंतर्गत एलियन्स तसेच मानवजात यापूर्वीच मंगळावर पोहोचली आहे.