जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk ! 8 कंपन्या, 3 विवाह, 6 मुलं – प्रत्येक सेकंदाला ‘इतकी’ कमाई

कॅनडा : वृत्तसंस्था – इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क ( Elon Musk) यांनी 2017 च्या अगोदरपासून पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत राहिलेले अमेझॉनचे जेफ बेजॉस यांना मागे टाकले आहे. आज ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World Rich man) आहेत. मस्क यांची नेटवर्थ 188 बिलियन यूएस डॉलरपेक्षा जास्त आहे, जी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांची नेटवर्थ 187 बिलियन यूएस डॉलरपेक्षा एक बिलियन डॉलरने जास्त आहे. जगातील हा सर्वात श्रीमंत व्यक्ती आयुष्यातील संघर्षाला तोंड देत कमी बोलला आणि जास्त काम केले. त्यांच्या जीवनातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रत्येक तरूणाने शिकल्या पाहिजेत.

एलन मस्क यांचा जन्म दक्षिण अफ्रीकामध्ये झाला होता. ते 17 वर्षांचे असताना कॅनडात आले होते. ग्रंज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, एलन बालपणी इतके आंतर्मुख होते की, बहिरेपणाची शंका आल्याने पालकांनी त्यांना डॉक्टरला दाखवले होते. एलन यांच्या आईला अखेर जाणवले की, ते डे ड्रीम म्हणजे दिवास्वप्न पाहतात. त्यांच्या आईने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, अनेकदा असे होत असे की, तो आपल्या जगात हरवून जात होता आणि त्याला आजूबाजूनचे भान राहात नसे. अगोदर मी अस्वस्थ होत असे परंतु नंतर मी त्याला एकटे सोडून दिले कारण मला समजले की, तो आपल्या मनात एखादे रॉकेट डिझाईन करत आहे.

एलन यांची आपल्या वडीलांसोबत जास्त जवळीक नव्हती. एलन यांचे वडिल त्यांच्या स्वप्नांना सपोर्ट करत नव्हते. एलन यांनीही म्हटले होते की, वडील कधीही त्यांच्या स्वप्नांना सपोर्ट करत नव्हते आणि त्यांचे बालपण त्रासाने भरलेले होते. एलन यांनी अनेकदा आपल्या वडीलांशी बोलणे सुद्धा बंद केले होते. एकदा एलन यांच्या वडीलांनी घरात घुसलेल्या तीन चोरांना गोळी सुद्धा मारली होती.

लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे असलेले एलन 9-10 वर्षाच्या वयातच कम्प्यूटर प्रोग्रॅमिंग शिकू लागले होते. एलन यांनी स्पेस थीमशी संबंधीत एक कम्प्युटर गेम बनवला होता आणि तो एका कम्प्यूटर मॅगझीनला 500 डॉलर्समध्ये विकला होता. या गेमचे नाव ब्लास्टार होते आणि तो आज सुद्धा ऑनलाइन खेळला जाऊ शकतो. एलन यांचा बालपणातील जास्तीत जास्त वेळ पुस्तकांमध्येच जात होता. ते 10-10 तास पुस्तकांमध्येच रमून जात असत. रिपोर्टनुसार, एलन यांनी इनसायक्लोपिडीया ब्रिटॅनिका नऊ वर्षाच्या वयात पूर्ण केले होते. नंतर त्यांचा रस सायन्स फिक्शन उपन्यासमध्ये वाढू लागला होता.

अनेक ठिकाणी एलेन यांनी या घटनचा उल्लेख केला आहे की, लहानपणी त्यांना इतर विद्यार्थी बुली करत असत. एकदा काही मुलांनी त्यांना जीन्यावरून खाली पाडले होते. ज्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते. एकदा त्यांना इतके मारण्यात आले होते की, त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकत होता. याच कारणामुळे एलन यांनी कराटे आणि ज्यूडोचे ट्रेनिंग 15 व्या वर्षी घेतले होते.

एलन मस्क यांना दक्षिण अफ्रीकेत मिलिट्री जॉइन करायची नव्हती, यासाठी ते कॅनडामध्ये आले होते. ते पीएचडी करण्यासाठी स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीत गेले होते, परंतु अवघ्या दोन दिवसात या युनिव्हर्सिटीतून परत आले. कारण एलन यांनी 90 च्या काळात इंटरनेट बूमचा फायदा उचलण्यासाठी हा निर्णय घेतला होता.

त्यांच्या वैयक्तिक जीवनबाबत बोलायचे तर एलन मस्क यांनी कॅनडाच्या लेखिका जस्टिनसोबत 2000 मध्ये विवाह केला होता. हे नाते आठ वर्षापर्यंत चालले. 2008 मध्ये एलन आणि जस्टिन यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यांनी ब्रिटिश अभिनेत्री तालुला रायली सोबत 2010 मध्ये विवाह केला. मात्र दोन वर्षानंतर दोघांचे नाते संपुष्टात आले. परंतु त्यांनी पुन्हा एकदा 2013 मध्ये लग्न केले, परंतु तीन वर्षानंतर पुन्हा विभक्त झाले. यानंतर एलन आणखी एक सुपरस्टार अभिनेत्री एंबर हर्डच्या रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी आपल्या बिझी शेड्यूलमुळे लवकरच ब्रेकअप केले होते.

एलन मस्क यांची पहिली पत्नी जस्टिनपासून 6 मुले आहेत, ज्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला होता. हे पाचही मुलगे आहेत. एलन आणि त्यांची गर्लफ्रेंड यांना याच वर्षी एक मुलगा झाला आहे. त्यांनी याचे नाव द ट्ठ अ-दळळ ठेवले आहे. एलन यामुळे एलेन सोशल मीडियावर खुप वायरल झाले होते.

एलन मस्क यांच्या कमाई बाबत बोलले जाते की, त्यांची कमाई प्रत्येक सेकंदाला 67 लाख रुपये आहे. एलन मस्क आतापर्यंत आठ कंपन्यांचे फाउंडर आहेत. ज्यामध्ये स्पेस एक्स, टेस्ला, हायपरलूप आणि बोरिंग कंपनी सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यांना बोरिंग कंपनीची आयडिया तेव्हा आली होती जेव्हा ते अमेरिकेत ट्रॅफिकमध्ये फसले होते. 2016 मध्ये त्यांनी ट्विट केले होते की, ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी अंडरग्राऊंड बोगद्यांचा वापर करू परंतु असे करणे खुप महागडे आहे आणि त्यांची कंपनी तंत्रज्ञान आणि स्मार्ट इंजिनियरिंगच्या आधारे याच कामात लागलेली आहे.