High Speed इंटरनेटसाठी Elon Musk यांची Google सह भागीदारी; मुकेश अंबानींच्या Jio ला टक्कर?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतातील सर्वात टेलिकॉम Reliance Jio कंपनी ग्राहकाला अधिक योजना आणि ४ जी बाबत फार्मात असलेली कंपनी आहे आणि आता ५जी देखील सुरु करत आहे. मात्र आता एलन मस्क यांनी इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी गुगल (Google) सोबत संगनमत केली आहे. तसेच यावरून या संगनमत द्वारे स्टारलिंक सॅटालाईट Google द्वारे संगणकीय आणि नेटवर्क संसाधने प्रदान केले जाणार आहे तर स्पेसएक्स Google Data सेंटरमध्ये एक ग्राऊंड स्टेशन स्थापित करून, जे स्पेसएक्स उपग्रहाशी जोडण्यात येणार आहे. आगामी काही दिवसामध्ये जगातील प्रत्येक ठिकाणी हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे.

या भागीदारीचा रिलायन्स जिओला बसणार धक्का ?
एलन मस्क यांनी हायस्पीड इंटरनेटसाठी गुगल बरोबर भागीदारी केल्याने अंबानींच्या जिओला धक्का बसण्याची शक्यता आहे. यांच्या भागीदारीमुळे Reliance Jio ला यामुळे मोठा धक्का बसू शकतो. jio कंपनीचे ४० कोटीहून जास्त ग्राहक आहेत. तसेच Jio 5 G लॉन्चच्या देखील तयारीत आहे. Reliance Jio चे वर्चस्व असलेल्या विभागात मस्ककडून उपग्रह आधारित हायस्पीड इंटरनेट सुविधा देण्याचे काम सुरु आहे, म्हणून यासाठी पूर्व नोंदणी सुद्धा सुरू केली गेली आहे. तर या वर्षीच्या शेवटी देशात (भारत) लॉन्च केली जाऊ शकणार आहे.

एलन मस्क आणि Google ची भागीदारी –
एलन मस्क यांनी Google सह केलेल्या भागीदारी मध्ये SpaceX च्यावतीने Google Data सेंटर प्रॉपर्टीजद्वारे Starlink ग्राउंड स्टेशनचा शोध घेणार आहे. तर Google क्लाऊडच्या कक्षेमध्ये आगामी काही दिवसामध्ये दीड हजार Starlink उपग्रह अनुमानित करण्याचा प्लॅन आहे. मुख्यतः वापरकर्त्यांना कोणत्याही संकटांशिवाय या हायस्पीड इंटरनेटचा वापर करता येणार आहे. यामध्ये जागतिक संस्थाच्या सहकार्याने एक संरक्षित कनेक्शन पायाभूत सुविधा बनवली आहे. सध्या Starlink चे जगात १० हजारहून जास्त वापरकर्ते आहे. Starlink project उपग्रह आधारित internet प्रदाता कंपनी आहे. तसेच या साहाय्याने Starlink जगातील कुठल्याही ठिकाणी हायस्पीड सुविधा पुरवणार आहे.