एल्फिन्स्टन दुर्घटना: रेल्वेमंत्र्यांच्या घोषणा आणि वास्तव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबईत एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीला आज वर्ष एक पूर्ण झाले आहे. या घटनेला मुंबईकर आजही विसरू शकत नाहीत . या दुर्घटनेत २३ जण मृत्युमुखी झाले होते, तर ३९ जण जखमी झाले होते. मुंबई रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला होता. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या घटनेनंतर अनेक घोषणा केल्या. पण वर्षभरानंतर त्या घोषणांचं काय झालं? हा मात्र प्रश्नच राहिला आहे.

त्या दिवशी काय घडलं?

सकाळी साडेदहाच्या सुमारास मध्य मुंबईत पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक प्रवासी पुलावरच थांबले होते. अशातच, परळ आणि एल्फिन्स्टन दोन्ही स्टेशनांवर एकापाठोपाठ एक लोकल ट्रेन येत होत्या आणि पुलावरची गर्दी वाढतच होती. अशातच, पुलाचा पत्रा तुटल्याचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. पुलाचा एक भाग कोसळत असल्याची अफवा पसरली आणि जो-तो बाहेर पडण्यासाठी धावत सुटला. त्यामुळंच ही चेंगराचेंगरी झाली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32d18543-c3bc-11e8-97be-e562eb57e598′]

या घटनेनंतर रेल्वेमंत्र्यानी केलेल्या घोषणा

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर वर्षभरात ३० नवे पादचारी पूल उभारणार

मुंबईच्या सर्व लोकलमध्ये सीसीटीव्ही बसवणार

रेल्वे स्थानकांजवळील अवैध फेरीवाल्यांना हटवणार

मुंबईतील ८ रेल्वे यार्डांचं अत्याधुनिकरण करणार

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील नव्या पुलासाठी दिरंगाई का झाली? यासाठी चौकशी समितीची नेमणूक

[amazon_link asins=’B00KGZZ824,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ef2ba85-c3bd-11e8-87ea-6d2c7752da52′]

पण सध्याचे वास्तव काय ?

पश्चिम आणि मध्य रेल्वेने गेल्या वर्षभरात मुंबईत ३० नवे पादचारी पूल उभारल्याचा दावा केलाय. पण चुकीच्या ठिकाणी पूल उभारणी केल्याने रेल्वेने जनतेच्या पैशांचा अपव्यय केल्याचा आरोप प्रवासी कार्यकर्ता सुभाष गुप्ता यांनी केला आहे.

मोजक्याच लोकलमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.

एल्फिन्स्टन घटनेनंतर रेल्वे स्थानकांबाहेर गर्दी करणाऱ्या अवैध फेरीवाल्यांना हटवण्यात आलं खरं, पण आता फेरीवाल्यांनी पुन्हा आपलं बस्तान मांडल्याचं चित्र सर्वच रेल्वे स्थानकांबाहेर आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील १२ मी. रुंदीचा पूलाचं काम लालफितीत अडकल्यानं तो पूर्ण होण्यास दिरंगाई झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्याचा सविस्तर अहवाल मात्र अद्याप समोर आलेला नाही.

फेसबुकवर सायबर हल्ला ५ कोटी अकाउंट हॅक

फेसबुकची ५ कोटी अकाऊंट हॅक झाली आहेत.फेसबुकच्या View as या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा गैरफायदा घेत हॅकर्सने फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती खुद्द कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी दिली.हॅक झालेली पाच कोटी अकाऊंट नेमकी कोणत्या देशातील आहेत हे मात्र फेसबुककडून जाहीर करण्यात आलेलं नाही. हा सर्व प्रकार २५ सप्टेंबरला फेसबुकच्या लक्षात आला आहे. फेसबुकने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी फेसबुकने माफी मागितली आहे.

 

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B077S3Y5MQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’50054d65-c3bd-11e8-b321-7f4fcbdc1ea9′]