Coronavirus : लष्करातून निवृत्त पण वैद्यकीय क्षेत्रात अनुभव असलेल्यांनी महाराष्ट्राच्या मदतीसाठी पुढं यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत आहे, रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज जनतेशी संवाद साधत आहे. आज देखील जनतेशी बोलताना त्यांनी राज्यातील अशा लोकांना पुढे येण्याचे आवाहन केले जे आर्मीतून निवृत्त झाले आहेत आणि त्यांना वैद्यकीय क्षेत्र, नर्स, वार्ड बॉय अशा क्षेत्रातील अनुभव आहे.

आर्मी रिटायर आणि ज्यांना वैद्यकीय क्षेत्र, नर्स, वार्ड बॉय अशा क्षेत्रातील अनुभव आहे तसेच ज्यांनी याचे प्रशिक्षण घेतले आहे परंतु काही कारणाने सध्या काम करत नाहीत त्यांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे.

हे सर्व लोक [email protected] या ईमेल आयडीद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकतात असे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच हा ईमेल आयडी कोणतीही तक्रार करण्यासाठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. मुंबई, पुणे या जिल्हात कोरोनाचा आकडा वाढलेला आहे. याशिवाय इतर जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबई, पुणे सारख्या राज्यात अनेक भाग सील करण्यात आले आहे. अनेक भागात कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने हा लॉकडाऊन पुढे वाढू शकतो अशी शक्यता आहे. यावर अद्याप चर्चा सुरु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like