धक्कादायक ! घरी आलेल्या ‘मेव्हणी’चा त्यानं ‘कडक’ अश्लील व्हिडीओ बनवला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका तरुणीने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे आरोप केले होते. यामुळे त्याने कुटुंबाच्या मदतीने तरुणीला मारहाण केली आणि त्या युवतीला पिस्तुलाचा धाक धाकवत तिचा अश्लील व्हिडीओ देखील बनवला आणि यावरून त्या युवतीला ब्लँकमेलिंग सुरु झाले. यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली आणि चांदनी बाग पोलिसांनी तरुणीच्या बहिणीच्या पती सहित 7 अन्य लोकांन विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

तरुणीची बहीण पानिपत कॉलनीमध्ये राहत असून बहिणीच्या पतीने एक वेगळे घर देखील भाड्याने घेतलेले होते. दोन महिन्याआधी ती आपल्या बहिणीसोबत गेली असता तिने आपल्या बहिणीच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर तरुणीने याचा विरोध केला. थोड्या वेळानंतर त्या तिच्या बहिणीचा पती, आई वडील, दोन भाऊ हे सर्वजण घरी पोहचले आणि भांडण सुरु केले. आरोपीने आधी बायकोला मारहाण केली आणि एका खोलीत बंद केले.

त्यानंतर आरोपीच्या दोन्ही भावानी तरुणीवर केलेल्या हल्ल्यात ती जखमी झाली आणि बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिला पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपीने पिस्तुलाचा धाक धाकवत दोन भावांच्या मदतीने तरुणीचे कपडे फाडले आणि तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर तिला देखील धमकी देण्यात आली की, जर कोणाला काही बोलशील तर व्हिडीओ व्हायरल केला जाईल. त्यानंतर तिने महिला हेल्प लाईनवर फोन केला असता पोलिसांनी येऊन दोनीही बहिणींना वाचवले. त्यानंतर त्या तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी देखील नेण्यात आले. पोलिसांनी या विरोधात तक्रार दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

Visit : Policenama.com