कोलकाता येथील दूतावासात ‘राणी एलिझाबेथ’ यांनी केली बातचीत, ‘भारत-ब्रिटन’ सहकार्याबद्दल घेतली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकाता येथील ब्रिटीश उप उच्चायोगातील भारतीय दूतावास (Embassy Of India) संबंधित अधिकाऱ्याने राणी एलिझाबेथ द्वितीय यांना कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान ब्रिटीश नागरिकांच्या स्वदेशी परतण्याबाबत भारत आणि ब्रिटन यांच्यात जवळच्या सहकार्याची माहिती दिली आहे. कोलकाता येथील ब्रिटीश उप उच्चायोग येथे कार्यरत संजीबिता तारियांग यांनी शुक्रवारी भारतातील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांना मदत केल्याबाबतचे आपले अनुभव सांगितले.

त्यांनी सांगितले की कशाप्रकारे भारतात ब्रिटन टीमच्या समोर कोविड -19 ने एक अभूतपूर्व आव्हान उभे केले होते. त्याचबरोबर त्यांनी भारत आणि ब्रिटनमधील अधिकाऱ्यांच्या परस्पर सहकार्याद्वारे ब्रिटनच्या अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या देशात पाठविण्यात कशी मदत केली हे देखील सांगितले. कोलकाता येथील ब्रिटिश उप उच्चायुक्त कार्यालयातील प्रादेशिक दूतावासाशी संबंधित विकास अधिकारी तारियांग यांनी म्हटले की, ‘स्वदेशी परत जाण्यासाठी उड्डाणांचे व्यवस्थापन करणे एक मोठे आणि गुंतागुंतीचे ऑपरेशन होते, जे नियोजित पद्धतीने आणि परस्पर सहकार्याने केले गेले.’ आम्हाला देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान हालचालीसंबंधित परवानगीही घ्यावी लागली. मुख्य आव्हान मेघालय आणि मणिपूर यासारख्या दुर्गम ठिकाणाहून वाहतुकीची व्यवस्था करणे हे होते.

ब्रिटीश सरकारच्या कृतींबद्दलही चौकशी केली
ब्रिटनने एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील 11 शहरांमधून सुमारे 18,000 प्रवाशांना 66 चार्टर उड्डाणांद्वारे आपल्या देशात परत नेले होते. गेल्या आठवड्यात राणीने मुख्य मोहिमेमध्ये सामील झालेल्या कर्मचार्‍यांशी बातचीत केली होती. त्याचबरोबर त्यांनी लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर यूके सरकारने केलेल्या कामांची माहितीही घेतली.