आणीबाणीत काँग्रेसने संपूर्ण देशाचा कैदखाना केला: नरेंद्र मोदी 

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन

देशात आणीबाणी लागू करून ४३ वर्षे पूर्ण झाली.  ज्या दिवशी आणिबाणी लागू केली तो २५ जूनचा दिवस यावर्षी भाजपाकडून काळा  दिवस म्हणून पाळण्यात आला. याच निमित्ताने मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना ‘आणीबाणी हे काँग्रेसचे  पाप आहे. काँग्रेसने एका कुटुंबासाठी संविधानाचा दुरुपयोग करत देशात आणीबाणी लागू केली. आणीबाणीच्या काळात केवळ सत्तेच्या लालसेपोटी आपल्याच पक्षाची वाट लावून संपूर्ण देशाला कैदखाना करण्यात आले  होते,’ अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’08b04dcb-7926-11e8-a5ac-538131cc0b91′]

मुंबईत आणीबाणीविरोधात लढा देऊन लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा जेव्हा काँग्रेसमधील एका कुटुंबाला सत्ता जाण्याची भीती वाटू लागली तेव्हा तेव्हा त्यांनी देश संकटात सापडल्याचा कांगावा केला आहे. देशात भीतीचे वातावरण असल्याचा बनाव करून फक्त आम्हीच देशाला वाचवू शकतो अशी हाक देखील काँग्रेसने नेहमीच दिली आहे. असे मोदी म्हणाले.

आणीबाणीच्या बाबतीत बोलताना तर मोदींनी काँग्रेस वर कडाडून टीका  केली. ते म्हणाले, “आणीबाणीच्या काळात तर काँग्रेसकडून मिसा  कायद्याची भीती दाखवून लोकांना धमकावले जायचे. आणीबाणीच्या काळात अभियव्यक्ती स्वातंत्र्याचा अक्षरश: गळा घोटण्यात आला होता. या काळात  संपूर्ण देशच जणू कैदखाना झाला होता, असे  मोदी म्हणाले.