जेट एअरवेजच्या विमानाचे इंदोर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जेट एअरवेजच्या विमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत असून मुंबई-औरंगाबाद विमानाचा थरार ताजा असतानाच आज पुन्हा तब्बल ३६ हजार फुटांवर विमानाचे इंजिन बंद पडल्याने इंदोर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. गेल्या आठवड्यातही मुंबई- जयपूर विमानामधील प्रवाशांना नाकातून आणि कानातून रक्त येण्याचा त्रास सुरु झाल्याने विमान पुन्हा मुंबईला आणण्यात आले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]

आज सकाळी १०.४८ मिनिटांनी जेट एअरवेजच्या विमानाने ९६ प्रवाशांना घेऊन हैदराबाद विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र, ३६ हजार फूट म्हणजेच ११ किमी उंचीवर असताना इंजिनामध्ये बिघाड झाला. यावेळी विमान ८५० किमी प्रति मैल या वेगात होते. यामुळे विमानाला इंदोर विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले. पायलटांनी विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनीच्या तंत्रज्ञांना या प्रकाराबाबत कळविले असून विमानाची दुरुस्ती सुरु आहे. विमानात बिघाड झाल्याचे कळताच एअरलाइनने अथॉरिटिज आणि जेट एअरवेजच्या इंजिनिअरिंग टीमला याची माहिती दिली.

थोडक्यात वाचले भुजबळ व खासदार प्रीतम मुंडे

[amazon_link asins=’B071168B77,B071FPF3H3,B079C4NW33′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3932600c-c4b4-11e8-b152-5d89458d5c80′]

इंजिनात बिघाड आल्यानंतर पायलटने प्रसंगावधान राखून विमानाची स्पीड कमी केला. त्यानंतर इंदूर विमानतळावर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी इमरजन्सी लँडिंग केली. पायलटच्या प्रसंगावधनामुळे विमानातील ९६ प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जेट एअरवेजबाबत अशा प्रकराची १० दिवसांतली ही तिसरी घटना आहे. शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगऩ भुजबळ यांच्यासमवेत खासदार प्रीतम मुंडेंसह अन्य महत्वाचे पदाधिकारी औरंगाबादला जात होते. यावेळी विमान अचानक खाली जाऊ लागले होते. या विमानचेही इमर्जन्सी लँडींग करण्यात आले.

भोसरी / पिंपरी | भाच्यानेच केला मामाचा खून, अवघ्या आठ तासात गुन्हा उघड

तसेच गेल्या आठवड्यात मुंबई- जयपूर विमानामध्ये हवेच्या दाबाचा बिघाड झाल्याने 33 प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्त येऊ लागले होते. यामुळे त्यांना पुन्हा मुंबई विमानतळावर आणण्यात आले.
जाहिरात.