धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापुरात आज राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटलं आणि त्यानंतर त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. वाऱ्याचा उलट वेग असल्याने हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. दरम्यान धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोन्ही नेते सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे.

मी सुखरुप,अफवांवर विश्वास ठेवू नका : धनंजय मुंडे

दरम्यान, हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. ते म्हणाले, “मी बीड येथील भगवानगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, आम्ही १० मिनिटांत कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत.” अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान, आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात ४ ठिकाणी सभा होणार आहेत. त्यामध्ये कागल नंतर मुदाळ तिठा, कोल्हापूर शहर आणि जयसिंगपूर शहरात सभा होईल. त्यानंतर आज रात्रीच ही परिवर्तन यात्रा सांगली जिल्ह्यात जाणार आहे.

उद्या म्हणजेच मंगळवारी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रांच्या जाहीर सभा होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, त्या ठिकाणीच सभा आयोजित केल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे सगळे नेते सरकारवर काय टीका करणार याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like