देशात आता आणीबाणीची लागू होणार : अरूंधती रॉय यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काही महिन्यांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदप्रकरणी देशभरातून मंगळवारी डाव्या विचारसरणीच्या काही लोकांवर अचानक अटकेची कारवाई आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या अटकसत्रावर नाराजी व्यक्त करताना, देशात आता आणीबाणी लागू होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी व्यक्त करत सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

[amazon_link asins=’9380349300,9386025426′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7eeedc4-ab3d-11e8-9fe7-d38b2977f7ab’]

अरुंधती रॉय म्हणाल्या, आगामी निवडणुकांसाठी ही तयारी सुरु आहे. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही. याविरोधात आपल्याला एकत्र यावे लागेल अन्यथा ज्यावर आपल्याला गर्व आहे असे सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य आपण गमावून बसू. देशातील ही स्थिती अगदी आणीबाणीची घोषणा होण्याच्या स्थितीसारखी आहे. दिवसाढवळ्या लोकांच्या हत्या करणारे आणि जमावाकडून हत्या करणाऱ्यांवर देशात कारवाई होत नाही. तर वकिल, कवी, लेखक आणि दलितांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि विचारवंतांच्या घरांवर छापेमारी आणि अटकसत्र सुरु आहे. भारत कुठे चालला आहे याचे हे घातक आहे. मारेकऱ्यांना आता सन्मानित केले जाईल तसेच त्यांचा आनंदही साजरा केला जाईल, तर न्याय आणि बहुसंख्यांकांविरोधात जो बोलेल त्यांना गुन्हेगार बनवले जाईल.

याचा अटकसत्रावर प्रतिक्रिया देताना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ नेते प्रकाश करात म्हणाले, हा लोकशाही अधिकारांवर हल्ला आहे. या लोकांवरील सर्व खटले त्वरीत मागे घेण्यात यावेत तसेच लवकरात लवकर त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी खरात यांनी केली आहे.

औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला ५ हजारांची लाच घेताना अटक