देशातील सर्वात मोठया लोन देणार्‍या कंपनीनं दिलं दिवाळी ‘गिफ्ट’, एवढा कमी होणार तुमचा EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येणाऱ्या सणासुदीच्या काळात तुम्ही घर घेण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह कर्ज देणाऱ्या प्रमुख HDFC बँकेने आपल्या व्याजदरात 0.10 % कपात केली आहे. त्यातच आंध्रा बँकेने MCLR मध्ये 0.10 % नी कपात केली आहे. RBI ने 2019 पासून रेपो दरात एकूण 1.35 % नी कपात केली आहे त्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात कपात करायला सुरुवात केली आहे.

सगळ्या ग्राहकांना मिळणार फायदा
HDFC बँकेने सुद्धा आता नुकतेच आपल्या व्याजदरामध्ये बदल केले होते. या कपातीचा फायदा जुन्या ग्राहकांसहित नव्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

15 ऑक्टोबर पासून लागू होणार कपात
ग्राहकांसाठी व्याज दर कमीत कमी 8.25 % आणि जास्तीत जास्त 8.65 % दिला जाणार आहे. ही कपात पंधरा ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. RBI ने आपल्या रेपो दरात कपात केल्यानंतर अनेक बँकांनी सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यायला सुरुवात केली होती.

गृह कर्जासाठी HDFC बँकेची प्रतिस्पर्धी असलेल्या SBI ने देखील आपल्या व्याज दरात 0.10 % नी कपात केली आहे. SBI चे अजूनही काही कर्ज एमसीएलआरशी जोडले गेलेले आहेत. जुलै पासून बँकेने नवीन रेपो दर लागू केलेले आहेत.

आंध्रा बँक सगळ्या प्रकारच्या कर्जाबाबत कमी करणार व्याज दर
आंध्रा बँकेने MCLR मध्ये 0.10 % कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात प्रत्येक कर्जावर लागू होणार आहे. या वर्षी एमसीएला 8.40 % वरून 8.30 % वर आणण्यात आले आहे. या राशीचा उपयोग ग्राहकांना कर्ज देण्यासाठी केला जातो. एका दिवसापासून ते सहा महिन्यांसाठीच्या व्याज दरात 0.10 % ची कपात करण्यात आली आहे. सध्या असलेला 8.35 % आरएलएलआर एक नोव्हेंबर पासून 8.10 % होणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी