‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेतील अभिनेत्री ‘ड्रॅगन क्वीन’ भारत भेटीवर !

दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलीवुडमधील टीव्ही मालिका गेम ऑफ थ्रोन्स न पाहिलेले व्यक्ती फार कमी प्रमाणात सापडतील. या कार्यक्रमात ड्रॅगन क्वीन डिनेरिस स्ट्रोमबोर्न हिची भूमिका फार गाजली होती. हॉलिवूडची अभिनेत्री एमिलिया क्लार्क हिने ती भूमिका साकारली होती. त्यामुळे तिचे देश-विदेशासह सगळीकडेच मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर आता एमिलीया भारतात आली.

हा कार्यक्रम संपल्यानंतर तिने ब्रेक घेतला असून यासाठी ती भारतात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आली आहे. उत्तराखंडमध्ये ती सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत असून याचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. याचबरोबर तिच्याबरोबर गेम ऑफ थ्रोन्स या कार्यक्रमात जॉन स्नो हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी देखील तिच्याबरोबर सुट्टीवर आली आहे. तिने यासंबंधी काही फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत. काही फोटोंमध्ये ती पूजेच्या फोटोंमध्ये दिसून येत आहे तर काही फोटोंमध्ये ती सेल्फी घेताना दिसून येत आहे.

यामध्ये तिने भारतीयांना नमस्कार करत आपल्या या सुट्टीविषयी सांगितले आहे. तिच्या या फोटोंवर गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेतील अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे.

दरम्यान, एमिलीया लवकरच आपला आगामी सिनेमा लास्ट ख्रिसमस मध्ये दिसणार आहे. यामध्ये अनेक मोठे कलाकार असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –