ढगांना दुभागत जमिनीवर लॅन्ड झालं विमान, ‘हा’ व्हिडिओ पहाच, आश्चर्याने व्हाल ‘थक्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमीरात एअरलाइन्सने ट्विटरवर शेअर केलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. शेअर होताच केवळ १० सेकंदांमध्ये तब्बल दोन लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. जो कोणी हा व्हिडिओ पहात आहे तो आश्चर्याने थक्क होत आहे. या व्हिडिओमध्ये एक विमान चक्क ढगांना चिरत एअरपोर्ट वर लँड होताना दिसत आहे. नेमकी काय आहे ही भानगड जाणून घेण्यासाठी एकदा हा व्हिडिओ पहाच.

मिळालेलय वृत्तानुसार हा व्हिडिओ लंडनच्या गॅटविक विमानतळावरील आहे. अमिरात एअरलाइन्सने या व्हडिओच्या कॅप्शन मध्ये ‘ग्रँड एन्ट्री’ असे म्हटले आहे. तसेच हा व्हडिओ टॉम जोन्स याने बनविला असल्याचे सांगत त्याचे आभारही मानले आहेत. दरम्यान व्हिडिओ बनवतेवेळी आकाश निरभ्र नसून ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र ढगच ढग दिसत आहेत. त्याचवेळी वव विमान लँड होताना दिसत असून ते ढगांना चिरत खाली येताना दिसते. हे दृश्य पाहणाऱ्यांना मजेदार वाटत असून अनेकांना याचे आश्चर्य वाटत आहे.

हा व्हिडिओ व्हिरल होत असून याला तब्बल ८ लाख ९० हजार लोकांनी पहिला असून ३ हजारहून अधिक लोकांनी रिट्विटही केला आहे. तसेच १० हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या असून हजारो कंमेंट्स देखील मिळाल्या आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक गमतीदार कंमेंट्स केल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –