‘कोरोना’ संक्रमण वेगाने वाढू लागल्यानं फ्रान्समध्ये नव्या लॉकडाऊनची घोषणा, रिकव्हरी रेट खुप कमी

पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन यांनी बुधवारी आपल्या देशात एका नव्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परंतु, त्यांनी म्हटले की, लॉकडाऊनच्या दरम्यान शाळा आणि काही कामाची ठिकाणे उघडी राहतील. कोरोना व्हायरस संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ही घोषणा करण्यात आली. कोविड-19 रूग्णांच्या संख्या वाढल्याने युरोपची हॉस्पीटल भरू लागली आहेत.

फ्रान्सच्या नेत्याने म्हटले की, कोविड-19 चा सामना करण्याची लॉकडाऊनच एकमेव पद्धत आहे. येथे शुक्रवारी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लागू होत आहे. या दरम्यान, फ्रान्सची सर्व रेस्टॉरन्ट, बार आणि अनावश्यक व्यवसाय बंद राहतील. मात्र, कारखाने, शेती आणि कन्ट्रक्शनची कामे सुरू ठेवण्यात येतील. याशिवाय नर्सिंग होम सुद्धा उघडी राहतील.

फ्रान्स कोरोनाने सर्वात प्रभावित पाचवा देश
फ्रान्स कोरोना व्हायरसने सर्वात प्रभावित पाचवा देश आहे. वर्ल्डोमीटरनुसार, मंगळवारी फ्रान्समध्ये महामारीने 530 लोकांचा मृत्यू झाला आणि 33,417 नवी प्रकरणे समोर आली. फ्रान्समध्ये संक्रमितांची एकुण संख्या 12 लाखांपेक्षा जास्त आहे आणि 35 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. येथ रिकव्हरी रेट खुप कमी आहे. केवळ 1 लाख 13 हजार लोक बरे झाले आहेत, 10 लाखांपेक्षा जास्त रूग्णांवर उपचार सुरू आहेत. भारताशी तुलना केली तर येथे 80 लाख संक्रमितांपैकी 73 लाख रूग्ण रिकव्हर झाले आहेत.

बेल्जियम, नेदरलँड, स्पेन आणि चेक गणराज्यात सुद्धा संसर्गाची प्रकरणे अशाच प्रकारे वाढत आहेत. जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल सुद्धा देशाच्या 16 राज्यांच्या गव्हर्नरवर आंशिक लॉकडाऊनची घोषणा करण्यासाठी दबाव आणत आहेत. जर्मनीमध्ये नव्या प्रतिबंधांच्या योजनेचा विरोध होत आहे आणि हजारो लोक बर्लिनच्या ब्रांडनबर्ग गेट क्षेत्रात आंदोलने करत आहेत.

You might also like