पैसे देण्यास दिला नकार तर आई-वडीलांवर ठोकली केस, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीवर सुद्धा खटला भरला ‘या’ ‘बेरोजगार मुलाने’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट एका बेरोजगार व्यक्तीने आपल्या आई-वडीलांवर त्याला संपूर्ण आयुष्यभर देखभालीसाठी पैशाची मागणी करत केस केली आहे. 41 वर्षांचा फैज सिद्दीकी एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट आहे आणि मोठ्या कालावधीपासून बेरोजगार आहे. त्याचा दावा आहे की तो पूर्णपणे आपल्या श्रीमंत आई-वडीलांवर अवलंबून आहे.

फैजने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून वकीलीचे शिक्षण घेतले आहे. त्याने आपल्या आई-वडीलांवर केस करत मागणी केली आहे की, त्यास जीवनभर देखभालीसाठी खर्च देत रहावे. फैजचे आई-वडील दुबईत राहातात. लंडनमध्ये त्यांच्या फ्लॅटमध्येच फैज राहतो. 20 वर्षांपासून फैज भाडे न देता यामध्ये रहात आहे. हा फ्लॅट लंडनच्या हायडी पार्कमध्ये असून त्याची किंमत 1 मिलियन पाऊंडपेक्षा सुद्धा जास्त आहे.

दर महिन्याला खर्चासाठी देतात दिड लाख रुपये
फैजचे आई-वडील वृद्ध झाले आहेत. त्याची आई 69 वर्षांची आणि वडील 71 वर्षांचे आहेत. सध्या ते फैजला 400 पाऊंड म्हणजे 40 हजार रुपये प्रत्येक आठवड्याला खर्चासाठी पोहचवतात. फैज आपल्या आई-वडीलांकडून एक महिन्यात सुमारे दिड लाख रुपये घेतो. तसेच त्याचे बिल सुद्धा ते भरतात. फैजने आपल्या आई-वडीलांवर केस यासाठी केली आहे कारण आपसातील तणाव आणि वादामुळे आई-वडीलांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला आहे.

‘मानवाधिकाराचे उल्लंघन’ झाल्याचा दावा
फैज सिद्दीकीचा दावा आहे की, त्याला आपल्या आई-वडीलांकडून आयुष्यभर आर्थिक सहकार्य मिळवण्याचा अधिकार आहे. कारण लहानपणापासून त्याच्या खराब आरोग्यामुळे त्याचे करियर आणि जीवनाचे मोठे नुकसान झाले. त्याचे म्हणणे आहे की, त्याचे आई-वडील त्यास आर्थिक सहकार्य देत नाहीत हे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून केली 1 मिलियन पाऊंड्सची मागणी
फैजच्या आई-वडीलांचे वकील जस्टिन वारशॉ यांनी म्हटले की, ते मोठ्या कालावधीपासून आपल्या मुलाला आर्थिक सहकार्य करत होते, परंतु आता त्यांना ते करायचे नाही. फैजने यापूर्वी सुद्धा पैशांच्या डिमांडसाठी दावा केलेला आहे. 2018 मध्ये त्याने आपल्याच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीवर केस केली होती आणि 1 मिलियन पाऊंड्सची मागणी केली होती. त्याने आरोप केला होता की, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षणाचा स्तर चांगला नव्हता, ज्यामुळे त्याला नुकसान सोसावे लागले आणि तो एखाद्या चांगल्या लॉ कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेऊ शकला नाही. कोर्टाने फैजचा हा खटला फेटाळला होता.