Employed Wife | हायकोर्टाची कठोर टिप्पणी ! नोकरदार पत्नीचा ‘कमावणारी गाय’ म्हणून वापर करू शकत नाही

नवी दिल्ली : Employed Wife | दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) एका याचिकेची सुनावणी करताना स्पष्टपणे म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला नोकरी करणार्‍या पत्नीला (Employed Wife) कोणत्याही भावनात्मक संबंधाशिवाय एक कमावणारी गाय (Cash Cow) म्हणून वापर करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. या दरम्यान कोर्टाने महिलेचे अपील स्वीकारात पतीच्या वर्तनाला क्रुरता मानत त्यांच्या घटस्फोटाला (Divorce) मंजूरी दिली आहे.

कौटुंबिक न्यायालयाने नाकारला होती घटस्फोटाची मंजूरी

जस्टिस विपिन सांघी (Justice Vipin Sanghi) आणि जस्टिस जसमीत सिंह (Justice Jasmeet Singh) यांच्या पीठासमोर महिलेने कौटुंबिक न्यायालयाच्या (Family Court) त्या आदेशाला आव्हान दिले होते ज्यामध्ये कौटुंबिक न्यायालयाने (family court) यास क्रुरता किंवा त्यागाचे कारण मानन्यास नकार देत घटस्फोट मंजूर केला नव्हता. या दाम्पत्याचा विवाह 2000 मध्ये झाला होता, जेव्हा पत्नी अल्पवयीन होती (Employed Wife) आणि 13 वर्षाची होती. तर पतीचे वय 19 वर्ष होते.

Pandharpur Kartiki Ekadashi Yatra | तब्बल 20 महिन्यांनंतर पंढरपूर पुन्हा एकदा वारकर्‍यांनी गजबजणार ! जिल्हा प्रशासनाकडून कार्तिकी यात्रेस परवानगी

विनंती करूनही पतीने सासरी नेले नाही

2005 मध्ये प्रौढ झाल्यानंतर सुद्धा पत्नी नोव्हेंबर 2014 पर्यंत माहेरात राहिली.
या दरम्यान शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या पात्रतेच्या आधारावर दिल्ली पोलीस (Delhi Police) दलात नोकरी मिळवण्यात यशस्वी झाली.
या दरम्यान महिलेने युक्तीवाद केला की, तिच्या कुटुंबाने तिच्या पतीला तिला सासरी घेऊन जाण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तो तिला सासरी घेऊन गेला नाही.

नोकरी मिळताच घरी घेऊन जाण्यास तयार

महिलेने म्हटले, 2014 मध्ये दिला दिल्ली पोलीस दलात नोकरी (Employed Wife) मिळाल्यानंतर ताबडतोब तिचा पती तिला सासरी घेऊन जाण्यास तयार झाला. याचे मुख्य कारण तिच्या नोकरीतून त्याला मिळणारा पगार होते.

पतीने पत्नीची कमाई पाहिली – हायकोर्ट

या प्रकरणात कोर्टाने महिलेचा (Employed Wife) युक्तीवाद मान्य करत म्हटले की,
असे दिसून येत आहे की, पतीने अपीलकर्त्याला एक कमावणारी गाईच्या रूपात पाहिले आहे आणि दिल्ली पोलिसात नोकरी लागताच सासरी नेण्यास तयार झाला.

निर्लज्ज भौतिकवादी वृत्ती

कोर्टाने म्हटले, पतीच्या अशा निर्लज्ज भौतिकवादी वृत्तीमुळे आणि भावनिक संबंध नसल्यामुळे अपीलकर्त्यालाच मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागले असेल.
अशाप्रकारचा आघात तिच्या सोबत क्रुरता झाली हे ठरवण्यासाठी पुरेसा आहे.

पतीविरूद्ध होऊ शकते मानसिक क्रुरतेची केस

कोर्टाने सांगितले की, पतीकडे या गोष्टीचे कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण नाही की,
2005 मध्ये प्रौढ झाल्यानंतर ताबडतोब तो पत्नीला वैवाहिक घरात का घेऊन गेला नाही आणि तिला 2014 पर्यंत आपल्या आई-वडिलांच्या सोबत का राहावे लागले?
याबाबतीत पतीविरूद्ध मासिक क्रुरतेची केस होऊ शकते.

हे देखील वाचा

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार, CBI कस्टडी घेण्याच्या तयारीत

Aryan Khan Drugs Case | नवाब मलिकांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खंडणीसाठी ‘आर्यन’चं अपहरण, वानखेडेंशी घनिष्ठ मैत्री असणारे भाजपा नेते मोहित कंबोज मास्टर माईंड’ (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Employed Wife | high court stern remark employed wife cannot be used as earning cow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update