चेष्टेने गुदद्वारात हवा साेडल्याने कामगाराचा मृत्यू

कोल्हापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

शिल्पा माजगावकर

कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे इथल्या फौंन्ड्रीमध्ये काम करताना सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने बेशुध्द पडलेल्या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी दूर्देवी मृत्यू झाला. आदित्य दत्तात्रय जाधव असे मृताचे नाव आहे.
[amazon_link asins=’B078124279,B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f651fc2-bc26-11e8-9e2b-79fd66ebd40f’]

आदित्य जाधव या तरुणांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो अतिग्रे इथल्या एका फौंन्ड्रीमध्ये कामाला जात होता. नेहमीप्रमाणे ३ सप्टेंबर रोजी रात्रड्युटीवर तो गेला. मध्यरात्री तीनच्या सुमारास काम सुरु असताना आदित्य संबधीत सुपरवायझर जवळ आला. यावेळी त्याने आदित्यच्या केसावर, कपड्यावर हवा मारत असताना चेष्टेने प्रेशरने गुदद्वारात हवा सोडली. या वेळी अचानक जोराचा धक्का बसून तो खाली कोसळला. यावेळी सुरपवायझरने कोणताही गाजावाजा न करता त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतू आदित्य निपचीत पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उजेडात आला. घटनेपासून संशयित सुपरवायझर गायब आहे.
[amazon_link asins=’B07CZM1ZQ8,B07FW8KSFP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’255b4e37-bc26-11e8-a61a-45f226e8a9de’]

आदित्य जाधव मध्यरात्री बेशुध्द पडल्याने कामगारांनी त्याला इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृत्ती गंभीर असलेचे पाहून डॉक्टरांनी त्याला कोल्हापूरला हलविण्यास सांगितले. त्यानुसार नागाळा पार्क इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी दूर्देवी मृत्यू झाला. शाहुपूरी पोलीसांनी कारखान्यातील संशयित सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलीसांना ताब्यात घेतले आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.

You might also like