हिंजवडीत TCS कंपनीतील कर्मचाऱ्याची प्लास्टीक टॅगने गळफास घेऊन आत्महत्या

पुणे/हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन – हिंजवडी आयटी पार्क मधील TCS कंपनीत एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी कंपनीच्या सहाव्या मजल्यावर उघडकीस आली आहे. कपिल गणपत विटकर (वय-39 रा. उंड्री) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कपिल विटकर हे कंपनीमध्ये फ्रंट ऑफिसमध्ये काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विटकर यांनी विमानात बॅगेचे लॉक करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक टॅक एकत्र करुन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल यांचा मागील महिन्यात घरामध्ये अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्या पाठीत दुखणे सुरु झाले. मागील काही दिवासांपूर्वी ते सुट्टीवर होते. त्याचे ऑफिस कंपनीच्या तीसऱ्या मजल्यावर असून त्यांना सहाव्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केली.

कपिल याचे लग्न झाले असून ते उंड्री येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. कपिल हे आत्महत्या करत असतानाचे रेकॉर्डिंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाले नाही. मात्र, त्यांच्या गळ्याभोवती प्लास्टिक लॉक टँग गुंडाळलेले आढळून आले आहेत. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Visit : policenama.com