Employee Pension Scheme | सीलिंग हटवण्याची पुन्हा मागणी, लिमिट वाढवून होऊ शकते रू. 20,000 ! किती होईल पेन्शन ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Employee Pension Scheme | कर्मचारी पेन्शन योजना (EPS) वरील कमाल मर्यादा हटवण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. हे प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण, कामगार मंत्रालयाने याबाबत निर्णय घ्यावा, असे युनियनचे म्हणणे आहे. कोर्टाच्या बाहेर सुद्धा सेटलमेंट होऊ शकते. (Employee Pension Scheme)

 

सध्याच्या संरचनेत, EPS योजनेअंतर्गत पेन्शनसाठी 15000 रुपयांची कमाल मर्यादा आहे. या कमाल मर्यादेमुळे पेन्शनधारकांना अनेक वर्षांपासून अत्यंत कमी पेन्शन मिळत आहे. कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार मंत्रालयाला यासंदर्भात एक नोट प्राप्त झाली आहे. यामध्ये आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

 

Employee Pension Scheme : सध्या काय आहे नियम ?

जेव्हा एखादा कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) चा सदस्य बनतो, तेव्हा तो EPS चा देखील सदस्य होतो. कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के वाटा पीएफमध्ये जातो. कर्मचार्‍याव्यतिरिक्त, तेवढाच भाग नियोक्त्याच्या खात्यातून देखील जातो.

परंतु, नियोक्त्याच्या योगदानाचा एक भाग ईपीएस म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केला जातो. EPS मध्ये मूळ वेतनाचे योगदान 8.33% आहे. मात्र, पेन्शनपात्र वेतनाची कमाल मर्यादा रु. 15,000 आहे. अशावेळी दरमहा जास्तीत जास्त 1250 रुपये पेन्शन फंडात जमा करता येतील.

 

Employee Pension Scheme : उदाहरणाद्वारे समजून घ्या

सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचार्‍याचा मूळ पगार 15,000 रुपये किंवा त्याहून जास्त असेल, तर 1250 रुपये पेन्शन फंडात जमा केले जातात. जर मूळ वेतन 10 हजार रुपये असेल तर योगदान फक्त 833 रुपये असेल.

कर्मचार्‍याच्या निवृत्तीवर निवृत्ती वेतनाची गणना देखील केवळ 15 हजार रुपये इतकी कमाल वेतन मानली जाते. अशावेळी सेवानिवृत्तीनंतर कर्मचार्‍यांना ईपीएस नियमानुसार केवळ 7,500 रुपये पेन्शन मिळू शकते.

 

Employee Pension Scheme : 15,000 ची मर्यादा काढल्यास काय होईल ?

ईपीएफओच्या रिटायर्ड एन्फोर्समेंट अधिकारी भानु प्रताप शर्मा यांच्या मते, पेन्शनमधून 15 हजार रुपयांची मर्यादा रद्द केल्यास 7,500 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. परंतु, यासाठी नियोक्त्याचे ईपीएसमधील योगदानही वाढवावे लागेल.

 

कसे होते पेन्शनचे कॅलक्युलेशन ?

EPS कॅलक्युलेशनचा फॉर्म्युला = मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र वेतन x EPS खात्यातील जितकी वर्षे योगदान दिले ती संख्या)/70.

जर एखाद्याचा मासिक पगार (गेल्या 5 वर्षांच्या पगाराची सरासरी) रुपये 15,000 असेल आणि नोकरीचा कालावधी 30 वर्षे असेल,
तर त्याला दरमहा केवळ 6,828 रुपये पेन्शन मिळेल.

 

मर्यादा काढल्यास किती मिळेल पेन्शन ?

जर 15 हजारांची मर्यादा काढून टाकली आणि मूळ पगार 20 हजार असेल तर तुम्हाला फॉर्म्युलानुसार मिळणारी पेन्शन (20,000 X 30)/70 = रु 8,571 असेल.

 

पेन्शन (ईपीएस) साठी विद्यमान अटी

– EPF सदस्य असणे आवश्यक आहे.
– किमान नियमित 10 वर्षे नोकरीत असणे आवश्यक आहे.
– वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन मिळते. 50 वर्षांनंतर आणि वयाच्या 58 वर्षापूर्वी पेन्शन घेण्याचा पर्याय.
– पहिली पेन्शन घेतल्यावर कमी झालेली पेन्शन मिळेल. यासाठी फॉर्म 10D भरावा लागेल.
– कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शन मिळते.
– सर्व्हिस हिस्ट्री 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांना वयाच्या 58 व्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय मिळेल.

 

Web Title :- Employee Pension Scheme | employee pension scheme epf monthly ceiling on basic salary may increase check eps calculation on retirement epfo latest update

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा