Employee Pension Scheme | पेन्शनसाठी पीएफ अकाऊंटमध्ये केव्हापर्यंत करावे लागेल योगदान? जाणून घ्या फायद्याची बाब

नवी दिल्ली : Employee Pension Scheme | ईपीएफओच्या (EPFO) नियमांनुसार, कर्मचार्याच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेचा काही भाग त्याच्या पेन्शन खात्यात (EPS Account) देखील जातो. हे पैसे कर्मचार्यांच्या निवृत्तीनंतर दरमहा पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. पण तुम्ही पेन्शनसाठी (Employee Pension Scheme) पात्र आहात की नाही, तुम्हाला पेन्शनचे किती पैसे मिळतील? तुम्ही नोकरी किती वर्षे केली आणि नोकरीदरम्यान पीएफ खात्यात किती पैसे जमा केले यावर ते अवलंबून असते. जर तुमचे पैसे दर महिन्याला पीएफ खात्यात जात असतील, तर तुमच्या फायद्यासाठी येथे जाणून घ्या की किती वर्षांच्या सेवेनंतर तुम्ही पेन्शनचे पात्र बनता आणि त्यासाठी कोणत्या अटी आहेत?
कशी कॅलक्युलेट होते पेन्शन?
दर महिन्याला प्रत्येक कर्मचार्याच्या मूळ पगाराच्या 12 टक्के + डीए पीएफ खात्यात जातो. त्यापैकी 8.33 टक्के पेन्शन खात्यात (Employee Pension Scheme) आणि 3.67 टक्के दरमहा ईपीएफमध्ये जातात. पेन्शन खात्यात वर्षानुवर्षे जमा होणारा हा पैसा कर्मचार्याला निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळतो. पीएफ पेन्शनची गणना पीएफमधील पेन्शनची रक्कम, सदस्याचा पेन्शनपात्र पगार आणि सेवा वर्षांच्या संख्येवर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या पेन्शनची गणना करण्यासाठी हे सूत्र वापरू शकता – पेन्शनपात्र वेतन X एकूण सेवा वर्ष /70
पेन्शनसाठी पात्रता कशी तपासायची
– पेन्शन मिळवण्यासाठी पहिली अट, तुम्ही EPFO चे सदस्य असावे.
– किमान 10 वर्षे काम करणे अनिवार्य. कर्मचार्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना पेन्शन मिळते.
– पेन्शन मिळवण्यासाठी वय 58 वर्षे असणे आवश्यक.
मात्र वयाच्या 50 व्या वर्षानंतर ईपीएसमधून पैसे काढणे सुरू करू शकता, परंतु ती पेन्शन कमी असेल.
यासाठी फॉर्म 10D भरावा लागेल.
याशिवाय, पेन्शन 60 वर्षापर्यंत दोन वर्षांसाठी पुढे ढकलू शकता, त्यानंतर दरवर्षी 4 टक्के अतिरिक्त दराने पेन्शन मिळेल.
Web Title :- Employee Pension Scheme | employee pension scheme epfo pf account how long contribution will have to be made in eps
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे