Employee Pension Scheme | आता पगारदार वर्गाला मिळेल पहिल्यापेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Employee Pension Scheme | कामगार वर्गातून पेन्शन स्कीम-1995 अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, याबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रकरण प्रलंबित आहे. मात्र याच दरम्यान नोकरदार वर्गासाठी आणखी एक आनंदाची बातमी येत आहे. (Employee Pension Scheme)

 

नवी पेन्शन स्कीम आणण्याची योजना!

एका हिंदी न्यूज चॅनलच्या वेबसाईटच्या बातमीनुसार, EPFO चांगल्या फिक्स्ड पेन्शनसाठी (Fixed Pension) नवीन पेन्शन योजना (New Pension Scheme) आणण्याची योजना आखत आहे. नवीन योजनेअंतर्गत, कर्मचार्‍यांना पेन्शनची ठराविक रक्कम निवडण्याचा पर्याय मिळेल. चांगली गोष्ट म्हणजे पगारदार वर्गासोबतच स्वयंरोजगारधारकही नोंदणी करू शकणार आहेत.

 

जास्त पेन्शनसाठी मिळेल पर्याय

तुम्हाला पेन्शनसाठी किती रक्कम द्यावी लागेल, हे पगार आणि उर्वरित सेवा कालावधीच्या आधारावर ठरेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओकडून नवीन फिक्स्ड पेन्शन योजना आणण्याची तयारी सुरू आहे. फिक्स्ड पेन्शनची रक्कम दिलेल्या योगदानानुसार ठरवली जाईल. तुम्हाला हव्या असलेल्या पेन्शनच्या रकमेनुसार योगदान द्यावे लागेल. (Employee Pension Scheme)

 

आता दरमहिना 1250 रुपये मर्यादा

वास्तविक, EPFO कर्मचारी पेन्शन योजना-1995 च्या पर्यायाची तयारी करत आहे. EPS मधील सध्याची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. पण, त्यात किमान पेन्शन खूपच कमी आहे. ज्यात वाढ करण्याची मागणी भागधारकांकडून वारंवार केली जाते. सध्या, कमाल योगदान मर्यादा 1250 रुपये प्रति महिना आहे. अशा स्थितीत, अधिक पेन्शनच्या सोयीसाठी, EPFO नोकरदारांना पर्याय देण्याची तयारी करत आहे.

 

EPS चा सध्याचा नियम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPS) चा सदस्य झाल्यावर, तो आपोआप ईपीएसचा सदस्य बनतो. नियमांनुसार कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के वाटा पीएफमध्ये जातो. तोच भाग कंपनीच्या वतीने कर्मचार्‍याच्या नावावर ईपीएफमध्ये जमा केला जातो. मात्र, कंपनीचे 8.33% योगदान EPS मध्ये जमा केले जाते.

 

म्हणजेच ईपीएस मूळ वेतनाच्या 8.33% आहे. मात्र, पेन्शनपात्र पगाराची कमाल मर्यादा रु. 15,000 आहे. अशा स्थितीत दरमहा जास्तीत जास्त 1250 रुपये पेन्शन फंडात जमा करता येतील.

 

अशा प्रकारे केले जाते पेन्शनचे कॅलक्युलेशन

– ईपीएस कॅलक्युलेशनसाठी फार्म्युला = मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र वेतन x ईपीएस खात्यात जेवढे वर्ष योगदान होते) /70.

– जर एखाद्याचा मासिक पगार (शेवटच्या 5 वर्षांच्या पगाराची सरासरी) रुपये 15,000 असेल आणि नोकरीचा कालावधी 30 वर्षे असेल, तर त्याला दरमहा (15,000 X 30) / 70 = 6428 रुपये पेन्शन मिळेल.

 

मर्यादा काढली तर किती पेन्शन?

जर 15 हजारांची मर्यादा काढून 30 हजार केली तर तुम्हाला फॉर्म्युला (30,000 X 30) / 70 = 12,857 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल.

 

स्वयंरोजगारादारांसाठी चांगली बातमी

सध्या EPS मध्ये फक्त पगारदार वर्गासाठी पेन्शनचा पर्याय आहे. मात्र नवीन नियम लागू झाल्यास स्वयंरोजगारदारांसाठी सुद्धा आपली नोंदणी करता येणार आहे. या बाबतीत, निवृत्ती वेतनाची रक्कम स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीने केलेल्या योगदानाद्वारे ठरवली जाईल. म्हणजेच तुम्हाला हव्या असलेल्या पेन्शनच्या रकमेनुसार योगदान द्यावे लागेल.

 

सध्या EPS ची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.
नवीन नियम आल्यानंतर सध्याची EPS-95 पेन्शन योजनाही सुरू राहणार आहे.
म्हणजेच ईपीएसचा पर्याय देण्याची सरकारची तयारी आहे.
ज्याच्या मदतीने लोक भविष्यात अधिक पेन्शन मिळविण्यासाठी योगदान देऊ शकतात.

 

Web Title :- Employee Pension Scheme | epfo planning to introduce new pension scheme for private sector employee and self employed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा