खासगी कंपन्यांचे कर्मचारी निवृत्तीनंतर पेन्शनसाठी घरबसल्या करू शकतील अर्ज, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  खासगी कंपन्यांमधून निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना लवकरच पेन्शनसाठी ईपीएफओच्या स्थानिक कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागणार नाही. असे लोक पेन्शन सुरू करण्यासाठी उमंग अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करू शकतील, ज्यानंतर घरबसल्या पेन्शन सुरू होऊ शकते. कामगार आणि रोजगार मंत्रालय उमंग अ‍ॅपवर नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत खासगी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांसाठी आणखी एक पर्याय देण्याची तयारी करत आहे. यासोबतच डिजी लॉकरमध्ये इतर प्रमाणपत्रांप्रमाणे पेन्शनची पे-ऑर्डर सुद्धा ठेवता येईल.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनुसार, सध्या खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, ज्यांचा पीएफ 10 वर्षापर्यंत जमा झाला आहे, त्यांना पेन्शनचा अधिकार आहे. सेवानिवृत्ती किंवा 50 वर्षाच्या वयानंतर या लोकांना पेन्शन सुरू होते, परंतु पहिल्यांदा पेन्शनसाठी रजिस्ट्रेशनसह अनेक प्रकारच्या औपाचाकिता पूर्ण कराव्या लागतात. यासाठी निवृत्त व्यक्तीला जिल्ह्याच्या स्थानिक ईपीएफओ कार्यालयात जावे लागते. एकदा काम होत नाही, अनेकदा फेर्‍या माराव्या लागतात. मात्र उमंग अ‍ॅपद्वारे आता ही सुविधी उपलब्ध होईल.

अशाप्रकारे लोड होईल उमंग अ‍ॅप

मोबाइलवर गुगल प्ले-स्टोअरवरून अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. याशिवाय उमंग वेबसाइटवर दिलेला क्यूआर स्कॅन करून सुद्धा अ‍ॅप डाऊनलोड केले जाऊ शकते. तसेच, 9718391183 वर मिस्ड कॉल करून फोनवर उमंग अ‍ॅपची लिंक मिळवता येते.

असे करा रजिस्ट्रेशन

स्टेप 1-  उमंग अ‍ॅप ओपन करा आणि रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा. यानंतर मोबाइल नंबर व्हेरिफिकेशन पेजवर पोहचाल.

स्टेप 2-  येथे मोबाइल नंबर नोंदवून तुम्ही ओटीपी जेनरेट करा.

स्टेप 3 –  एकदा ओटीपी जनरेट केल्यानंतर आणि इनपुट केल्यानंतर एम-पिन सेट करण्यास सांगितले जाईल. एम-पिन सेट करताच रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. तुम्ही उमंग अ‍ॅप होम पेज पाहू शकता. हे पेज उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या सेवांची एक शॉर्टलिस्ट दाखवते. दिल्लीचे माजी मुख्य ईपीएफओ कमिशनर व्ही. एन शर्मा सांगतात की, उमंग अ‍ॅपवर नॅशनल पेन्शन स्कीममच्या पर्यायावर जावे लागेल. जिथे पेन्शन योजनेचा पर्याय असेल, येथून या सुविधेचा लाभ घेता येईल.