PNB, OBC आणि UBI च्या कर्मचाऱ्यांना दिलासा ! बँकांच्या विलीनीकरणामुळे नाही जाणार ‘नोकरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँक (PNB), युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) चे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून करण्यात आले आहे. पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरणानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सच्या कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची चिंता वाटत होती. PNB चे मुख्य अधिकारी मल्लिकार्जुन राव यांनी सांगितले की, विलीनीकरणामुळे कोणत्याही बँकेतील कर्मचाऱ्यांना काढले जाणार नाही.

विलीनीकरणानंतर PNB आहे देशातील दुसऱ्या नंबरची मोठी बँक

राव यांनी सांगितले की, तिन्ही बँकेच्या विलीनीकरणानंतर आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार नाही. विलीनीकरणानंतर PNB देशातील दुसऱ्या नंबरची मोठी बँक बनली आहे. पीएनबी च्या शाखांची संख्या देखील एसबीआय नंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. विलीनीकरणानंतर PNB चे स्वरूप आता 2.0 असे झाले आहे.

PNB ने विलीनीकरणानंतर स्पष्ट केलं होतं की, आता तिन्ही बँकांच्या खातेधारकांसोबत पंजाब नॅशनल बँकेसारखे नियम लागू करण्यात येतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20 ऑगस्ट 2020 देशातील 10 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं होतं, तिन्ही बँकांच्या विलीनीकरणानंतर PNB देशातील दुसऱ्या नंबरची मोठी बँक बनेल. पीएनबीचा एकूण कारभार 17.95 खर्व रुपये इतका झाला आहे.