Employees Pension Scheme बाबत मोठे अपडेट ! 9 पट वाढू शकते किमान पेन्शन, खात्यात दर महिना येतील इतके रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Employees Pension Scheme | कर्मचार्‍यांबाबत आणखी एक नवीन अपडेट समोर आले आहे. EPFO (Employees Provident Fund Organization) निवृत्ती वेतन योजनेची (EPS) किमान पेन्शन योजना नऊ पट वाढवण्याची तयारी सुरू आहे. यात सरकारने वाढ केल्यास कर्मचार्‍यांना मोठा फायदा होणार आहे. (Employees Pension Scheme)

 

म्हणजेच जिथे कर्मचार्‍यांना दरमहा 1-1 हजार रुपये दिले जात होते, तिथे आता नऊ पटीने वाढ करून दरमहा 9-9 हजार रुपये कर्मचार्‍यांच्या खात्यावर येतील.

 

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेब्रुवारीमध्ये होणार्‍या बैठकीत कामगार मंत्रालय या संदर्भात निर्णय घेऊ शकते. याशिवाय नव्या वेतन संहितेबाबतही या बैठकीत निर्णय होऊ शकतो. असे म्हटले जात आहे की, कर्मचार्‍यांच्या किमान पेन्शनमध्ये वाढ करणे हे या बैठकीचे लक्ष्य असेल.

 

मात्र, अद्याप या बैठकीबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. निवृत्ती वेतनधारक कर्मचार्‍यांकडून अनेक दिवसांपासून याची मागणी होत आहे. ज्यावर अनेकदा चर्चा झाली आहे.

 

स्थायी समितीनेही केल्या सूचना
किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्याच्या मागणीबाबत संसदेच्या स्थायी समितीनेही यासंदर्भात सूचना केल्या होत्या.
असे म्हटले जात आहे की, समितीच्या शिफारशींच्या आधारे किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. (Employees Pension Scheme)

 

या संदर्भात संसदेच्या स्थायी समितीने मार्च 2021 मध्ये यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.
किमान पेन्शन सध्याच्या एक हजारावरून तीन हजारांवर नेण्याची मागणी समितीने केली आहे.

कर्मचार्‍यांची नऊ हजार वाढवण्याची मागणी
निवृत्ती वेतनधारकांचे म्हणणे आहे की, 9000 रूपये वाढवावे आणि हे तेव्हाच होईल जेव्हा ईपीएस-95 शी संबंधित कर्मचार्‍यांना खर्‍या अर्थाने लाभ मिळेल.
याशिवाय, जो कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे किंवा निवृत्त झाला आहे आणि त्याच्या पेन्शनची गणना केली जात आहे,
तर त्याची पेन्शन मागील महिन्याच्या वेतनाच्या आधारे ठरवली जावी.

 

Web Title :- Employees Pension Scheme | big update regarding employees pension scheme minimum pension can increase up to 9 times

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Corona in Mumbai | मुंबईतील नवी रुग्णसंख्या 20 हजारांच्या वर! मुंबईत आता लॉकडाऊन लागणार?

Pune Crime | आर्मीमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक, ‘पिंपरी’ पोलिसांकडून सैन्यातून निवृत्त झालेल्या दोघांसह एजंट गजाआड

Aadhar Card बाबत नियमांमध्ये ‘हा’ बदल! जाणून न घेतल्यास लाभापासून राहाल वंचित