Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) ! सॅलरी लिमिट रू. 15,000 वरून वाढून रू. 21,000 करण्यावर सरकार करत आहे विचार; 75 लाख कर्मचार्‍यांना होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) | देशातील लाखो नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) सध्याची सॅलरी लिमिट वाढवण्याचा विचार करत आहे. ईपीएफओ सध्याची 15000 हजार रुपयांचे सॅलरी लिमिट 21,000 रुपये प्रति महिना करण्याचा विचार करत आहे. (Salary Limit Under EPF To Increased To 21000 Rs from- 15000 Rs)

75 लाख कर्मचार्‍यांना होणार फायदा

माहितीनुसार, ईपीएफओचे बहुतेक सदस्य या निर्णयाच्या बाजूने आहेत, कारण सॅलरी लिमिटमध्ये शेवटची सुधारणा 2014 मध्ये करण्यात आली होती. सॅलरी लिमिटची वाढ केल्याने आणखी लोकांना या कक्षेत आणले जाईल. त्याचा थेट लाभ 75 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांना मिळू शकतो.

सरकारची मान्यता आवश्यक

ईपीएफओ बोर्डाच्या या निर्णयावर सरकारची मंजुरी घेणे आवश्यक आहे, कारण सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच बोर्ड त्यावर पुढे जाऊ शकते. या निर्णयामुळे सरकारवर बोजा पडणार आहे. सरकार ईपीएफओच्या कर्मचारी पेन्शन योजनेवर दरवर्षी 6,750 कोटी रुपये खर्च करते. वेतन मर्यादा वाढल्यानंतर सरकारला त्यासाठी वेगळी तरतूद करावी लागणार आहे.

2014 मध्ये झाली शेवटची दुरुस्ती

15,000 रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या नोकरदार लोकांसाठी EPF योजना आवश्यक आहे. यामध्ये सरकार तुमच्या मूळ वेतनाच्या 1.6 भाग योगदान म्हणून देते. पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये केल्यास 75 लाख कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळू शकतो. मागील वेळी 2014 मध्ये पगार मर्यादा 15,000 रुपये करण्यात आली होती.

Web Title :- Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) | epfo alert salary limit under epf to increased to 21000 rs from 15000 rs know latest update


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | राज्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Pune Crime | गांजा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 4 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त

Narayan Rane | ‘हे तीन पक्षांचं सरकार…’; नारायण राणेंनी सांगितला ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहूर्त

Tata IPL 2022 | …म्हणून आयपीएलचा पुण्यातील ‘हा’ सामना हलवला मुंबईला, वाचा सविस्तर

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा