Employees Salary Hike | खुशखबर ! भारतात पुढील वर्षी लोकांच्या सॅलरीत होऊ शकते वाढ, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या तर, अनेकांच्या पगारात मोठी कपात झाली. परंतु येणारे वर्ष लोकांसाठी चांगले ठरू शकते. पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये तुमच्या सॅलरीत मोठी वाढ (Employees Salary Hike) होऊ शकते. देशातील कंपन्या आता हळुहळु लॉकडाऊनमधून उभारी घेऊ लागल्या आहेत आणि अर्जदारांचा पुरवठा हिशेबापेक्षा कमी आहे, ज्यामुळे कर्मचार्‍यांच्या सॅलरीत वाढ (Employees Salary Hike) केली जाऊ शकते.

सॅलरीत 8 टक्के होऊ शकते वाढ

Michael Page and Aon Plc नुसार, जर कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात राहिली तर एप्रिल 2022 पासून सुरू होणार्‍या आर्थिक वर्षात कर्मचार्‍यांची सॅलरी जवळपास 8% पर्यंत वाढू शकते. जी चालू आर्थिक वर्षासाठी सर्वेक्षणाचा अंदाज 6-8 टक्केपेक्षा जास्त आहे.

या क्षेत्रात दिसू शकते वाढ

ई-कॉमर्स, फार्मास्युटिकल, आयटी आणि आर्थिक सेवा सारख्या क्षेत्रांनी अगोदरच वेतनवाढ दिली आहे. Aon Plc मध्ये भारत आणि दक्षिण आशियासाठी चीफ कॉमर्शियल ऑफिसर रूपंक चौधरी यांच्यानुसार, संघटीत क्षेत्रासाठी कुशल कामगारांच्या कमी उपलब्धतेमुळे सॅलरीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

पण महागाई वाढली

भारताच्या आर्थिक वाढीवर महागाईचा परिणाम झाला आहे.
कोरोना महामारी दरम्यान रोजच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. महागाई प्रचंड वाढली आहे.
मात्र, यासाठी अल्पकालिन पूरवठ्याच्या मुद्द्यांना जबाबदार ठरवले जात आहे.

Web Title : Employees Salary Hike | good news for employees in india will see bigger pay rises next year 2022 know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | पुण्यातील दुकाने, हॉटेल्स सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी? अजित पवार म्हणाले…

Covid-19 Effects | कोरोना संसर्गानंतर ऐकण्याची क्षमतावर होतोय परिणाम? एक्सपर्टकडून जाणून घ्या याची लक्षणे

CoWin Portal वर स्वत: दुरूस्त करू शकता तुमचे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट, ‘ही’ आहे अतिशय सोपी पध्दत, जाणून घ्या