ESIC आणि SBI कडून संयुक्‍तरित्या ‘ही’ सुविधा सुरू, 3.6 कोटी कर्मचार्‍यांच्या खात्यात थेट पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) थेट लाभ हस्तांतरणासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शी करार केला आहे. यानुसार एसबीआय ईएसआयसीतील सर्व लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात ई-पेमेंट सेवा प्रदान करेल. मानवी हस्तक्षेपाशिवाय ही एकात्मिक आणि स्वयंचलित प्रक्रिया असेल.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ आपल्या सर्व भागीदारांना (Stakeholders) थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देऊ शकतात. ईएसआयसीने निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही पक्षांमध्ये करार झाला आहे. यानुसार एसबीआय ईएसआयसीतील सर्व लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात ई-पेमेंट सेवा प्रदान करेल.
बँक ईएसआयसीच्या लाभार्थ्यांना तसेच ई-पेमेंटच्या इतर प्राप्तकर्त्यांना रिअल-टाइम बेनिफिट्स प्रदान करेल. हे वेळ वाचवेल आणि देय विलंब कमी करेल. ईएसआयसीच्या सर्व भागधारकांना या सुविधेचा फायदा होईल.

या कर्मचार्‍यांना ESI योजनेचा लाभ मिळतो –

ESI योजनेचा लाभ अशा कर्मचार्‍यांना दिला जातो ज्यांचे मासिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे कमीतकमी 10 कर्मचारी असलेल्या कंपनीत काम करतात. 2016 पर्यंत मासिक उत्पन्न मर्यादा 15 हजार रुपये होती. जी 1 जानेवारी 2017 पासून वाढवून 21 हजार रुपये करण्यात आली.

देशभरात ESIC ची 151 रुग्णालये आहेत –

सध्या देशभरात ईएसआयसीकडे 151 रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये सामान्य ते गंभीर आजारांच्या उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत फक्त ईएसआयसी रुग्णालयात ईएसआयसी कव्हरेजमध्ये सामील असणाऱ्यांच उपचार मिळायचे, परंतु आता सरकारने सामान्य जनतेसाठीही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

योजनेचे फायदे –

– ईएसआयमध्ये नोंदणीकृत व्यक्तीस स्वत: आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यावर वैद्यकीय उपचार घेण्यास पात्र आहे.
– वैद्यकीय सुविधेसाठी दवाखाना उपलब्ध.
– ईएसआय हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सेवेची उपलब्धता.
– विशिष्ट परिस्थितीत ती व्यक्ती या कायद्यानुसार बेरोजगारी भत्त्यास पात्र ठरेल.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like