आपल्या ‘मर्जी’नुसार कमी PF कपात करू शकणार कर्मचारी, कॅबिनेटकडे नवं ‘विधेयक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नवीन सोशल सिक्योरिटी कोड बिल 2019 मध्ये सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या मर्जीनुसार पीएफ कट करण्याची सुविधा दिली आहे. केंद्रीय कॅबिनेटनं या नवीन बिलासाठी बुधवारी मंजुरी दिली आहे. लवकरच हे बिल संसदेत मंजुरीसाठी सादर केलं जाणार आहे.

कर्माचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना आपल्या मर्जीनुसार पीएफ कट करण्याची सुविधा मिळाल्यानं आता कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत वाढ होणार आहे. या सुविधेमुळे कर्माचाऱ्यांना मिळणारी टेक होम सॅलरी वाढणार आहे. टेक होम सॅलरी ती असते जी एका कर्मचाऱ्याला सर्व कटींग होऊन मिळते. ज्याला आपण नेट सॅलरी म्हणतो. नव्या बिलमध्ये म्हटलं आहे की, नोकरी देणाऱ्या कंपनीला आपला 12 टक्क्यांचा पूर्ण हिस्सा द्यावा लागेल. या सुविधेमुळे नोकरी देणाऱ्या कंपनीला कोणताही लाभ मिळत नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ मध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघांनाही एकूण सॅलरीच्या 12-12 टक्के योगदान द्यायचे आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणार युनिक आयडी कार्ड
नवीन सोशल सिक्योरिटी कोड बिल 2019 मध्ये केंद्र सरकारनं असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. यानुसार या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक युनिक आयडेंटी कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये कामगारांची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. हे युनिक कार्ड आधार कार्डसोबत लिंक असणार आहे. या कार्डमुळे असंघटित क्षेत्रातील कामगार सहजरित्या सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकतात.