‘नोकरी’ सोडल्यास २ दिवसात कंपनीला द्यावा लागेल कर्मचाऱ्याला ‘पगार’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता नोकरी सोडल्यास किंवा नोकरीवरुन काढून टाकल्यास याशिवाय कंपनी बंद पडल्यास कर्मचाऱ्याला दोन दिवसाच्या आत त्याचे वेतन देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ‘किमान वेतन कायदा विधेयका’त ही तरतूद करण्यात आली आहे. मंगळवारी ही विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. कॅबिनेटने या विधेयकाला मंजूरी दिली आहे. या विधेयकात सांगण्यात आले आहे की, जर कर्मचाऱ्याने राजीनामा दिला किंवा त्या कर्मचाऱ्याला निलंबित केले असेल किंवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडली असेल तर कर्मचाऱ्याला दोन वर्किंग दिवसात वेतन द्यावे लागणार आहेत.

विधेयकानुसार सध्या फक्त अनुसूचित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात येते. परंतू या विधेयकात बदल झाल्यानंतर सर्व क्षेत्रातील श्रमिकांना किमान वेतन मिळेल. केंद्र सराकार किमान वेतनासाठी एक ‘फ्लोर वेज’ तयार करण्यात येईल आणि यात कोणालाच कमी वेतन देण्यात येणार नाही. याशिवाय राज्य सरकार आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान वेतनात बदल करु शकेल. परंतू हे वेतन फ्लोर वेज पेक्षा कमी नसावे.

फ्लोर वेज फिक्स करण्याआधी पहिल्यांदा केंद्र सरकार ‘सेंट्रल एडवायजरी बोर्ड’शी सल्ला मसलत करेल. या बोर्डमध्ये राज्य प्रतिनिधी देखील असेल. विधेयकातील तरतूदींनुसार राज्यांद्वारे किमान वेतन निर्धारित करण्यासाठी राज्य सरकारला एक समिती नेमावी लागेल. समितीच्या शिफारसीनुसार किमान वेतन निर्धारित करण्यात येईल. विधेयकातील तरतूदींनुसार पाच वर्षात राज्यांना किमान वेतनाचे रिवाइज करणे अनिवार्य आहे. तरतूदीनुसार किमान वेतन दिले नाही तर पहिल्यांदा दोषी व्यक्तीला ५०,००० रुपये दंड भरावा लागेल. पुन्हा पाच वर्षांच्या आता दोषी आढळल्यास १ लाख रुपये दंड आणि ३ महिने तुरुंगवास भोगावा लागेल.

आरोग्यविषयक वृत्त