उद्या नगरला रोजगार मेळावा

अहमदनगर : पोलसनामा  – दीनदयाल उपाध्‍याय रोजगार व उद्योजकता मेळावा उद्या (दि. १४) सकाळी १० वाजता सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्‍मारक समिती सभागृहात होणार आहे. या मेळाव्‍यास विविध कंपन्‍यांचे अधिकारी उपस्थित राहून इच्छुकांची रोजगारासाठी निवडी करणार आहेत.

नगर येथील युरेका फोर्ब्‍स (तारकपूर), कायझन इंजिनीअर्स, रेणुका माता मल्‍टीस्‍टेट को. ऑप बँक, बजाज पॉवर इक्विपमेंट, हाय-टेक इंजिनीअर, आसरा इंजिनीअरिंग वर्क्‍स, सिद्धी सीएनसी व लार्सन अँड टुब्रो आणि श्रीगोदे तालुक्‍यातील आढळगाव येथील सह्याद्री ट्रॅक्‍टर्स या कंपन्‍यामध्‍ये विविध पदांसाठी २९३ जागांची भरती करण्‍यात येणार आहे. त्यासाठी दहावी, बारावी, पदवीधर तसेच आयटीआय- फिटर, वेल्‍डर, टेलर, पेंटर व टर्नर कामाचे शिक्षण घेतलेल्यांच्या मुलाखती होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्‍थळाद्वारे रोजगारासाठी स्वतःची माहिती व कंपनी निवड नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्रात (मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत, सावेडी, नगर. दूरध्‍वनी ०२४१-२४२५५६६) संपर्क साधण्याचे आवाहन सहायक संचालक वि. जा. मुकणे यांनी केले आहे.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा