बिहारच्या विद्यार्थ्यानं आई म्हणून सनी लिओनी आणि वडिल म्हणून लिहिलं इम्रान हाश्मीचं नाव ! अभिनेत्यानं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बिहारच्या मुजफ्फरपूरमधून अलीकडेच एक हैराण करणारा प्रकार समोर आला. एका 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या ॲडमिट कार्डवर आईवडिलांचं नाव चुकीचं लिहिलं होतं. यात वडिलांचं नाव इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आणि आईचं नाव सनी लिओनी (Sunny Leone) लिहिलं होतं.

इम्रान हाश्मीनं दिली प्रतिक्रिया

ही बातमी समोर आल्यानंतर आता इम्रान हाश्मीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. हीच बातमी रिट्विट करत त्यानं लिहिलं की, शपथ घेऊन सांगतो हा माझा नाहीये. इम्रान हाश्मीचं हे फनी ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

विद्यार्थ्यानं स्वत:चं लिहिल हे नावं

बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठा (Babasaheb Bhimrao Ambedkar University) च्या अंतर्गत येणाऱ्या बिहारच्या मुजफ्फरपूर शहरामधील मीनापूरमधील धनराज महतो कॉलेजच्या (Dhanraj Mahato) एका कुंदन कुमार नावाच्या विद्यार्थ्यानं आपल्या फॉर्ममध्ये आईचं नाव सनी लिओनी लिहिलं आणि वडिलांचं नाव इम्रान हाश्मी आणि पत्ता म्हणून मुजफ्फरपूरमधील चतुर्भुज ठिकाणाचा लिहिला. परीक्षा फॉर्म मध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील दिलेला आहे.