…म्हणून इम्रान हाश्मी घेणार प्रकाश जावडेकरांची भेट 

मुंबई : वृत्तसंस्था – इम्रान हाश्मीचा आगामी चित्रपट ‘चीट इंडिया’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिक्षण व्यवस्थावेवर आधारित आहे. याबद्दल इमरान हाश्मीने मंगळवारी एक ट्विट करुन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.
इमरानने ट्विट केले, की ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. ठाण्याची राहणारी शमिष्ठा सोमने परीक्षा व्यवस्थेमुळे आत्महत्या केली. ती मेडिकल परीक्षेचा (एमडी) ताण सहन करू शकली नाही. त्यामुळेच आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आणि भविष्यातील काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मी प्रकाश जावडेकर यांची या आठवड्यात दिल्लीत भेट घेणार आहे.’
‘चीट इंडिया’  या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये तो एका भ्रष्ट व्यक्तीची भूमिका साकारतोय.  या चित्रपटाची कथा सौमिक सेन यांनी लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. यात इमरान हाश्मी बरोबर श्रेया धन्वंतरी प्रमुख भूमिकेत आहे. १८ जानेवारी २०१९ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इम्रान हाश्मी सध्या व्यस्त आहे .