JOBS : महाराष्ट्रासह इतर 17 ठिकाणांवर हजारो जागांवर शिक्षक भरती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : शिक्षक भरतीची तयारी करीत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाने 17 राज्यांमध्ये 3 हजार 479 पदांवर शिक्षक भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक PGT टीचर आणि TGT टीचर पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवारांना 1 एप्रिल म्हणजेच आजपासून tribal.nic.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, मणीपूर, मिझोराम, ओडिसा, राजस्थान, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आदी 17 राज्यात ही भरती केली जाणार असून महाराष्ट्रात एकूण 216 जागा भरायच्या आहेत. भरती परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय परीक्षण एजन्सी करणार आहे.

याकरिता आजपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 30 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे. याची नेमकी तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. उमेदवारांची निवड ही कॉम्प्युटरवर आधारीत परिक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे.

पदांचे विवरण
प्राचार्य – 175 पदे
उपप्राचार्य – 116 पदे
पोस्ट ग्रॅजुएट टीचर- 1244 पदे
ट्रेंड ग्रॅजुएट टीचर – 1944 पदे
एकूण – 3479

शैक्षणिक पात्रता
प्राचार्य, उपप्राचार्य आणि पोस्ट ग्रॅजुएट टीचर पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीतकमी 50 टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याची पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच B. Ed किंवा समकक्ष पात्रतेची पदवी व कॉम्प्युटरचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. प्राचार्य, उपप्राचार्य पदासाठी अनुभवींना प्राधान्य दिले जाणार आहे. तर पोस्ट ग्रॅजुएट टीचरसाठी उमेदवाराला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये प्राविण्य लागणार आहे. याशिवाय टीजीटी पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतल्याचे प्रमाणपत्र 50 टक्के अट. तसेच B. Ed किंवा समकक्ष पदवी असायला हवी. अन्य माहितीसाठी खाली नोटिफिकेशन लिंक देण्यात आली आहे.