जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये मोठी चकमक; 4 दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या श्रीगुफवारा अनंतनागच्या शलगुल वन क्षेत्रात सध्या चकमक सुरु आहे. या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्याबाबत पोलिसांनी सांगितले, की आत्तापर्यंत दहशतवाद्यांच्या संख्येबाबत निश्चिपणे सांगता येत नाही. या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. मृतदेह मिळाल्यानंतरच याबाबतची माहिती दिली जाईल. सध्या या परिसरात कारवाई सुरुच आहे.

अनंतनागच्या शलगुन वन क्षेत्रात झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. मात्र, चकमकीबाबत कोणतीही अफवा पसरली जाऊ नये म्हणून या परिसरातील इंटरनेट सेवा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. जेव्हा पोलिसांना या परिसरात दहशतवादी असल्याचे समजले त्यानंतर पोलिस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) मिळून सर्च ऑपरेशन सुरु केले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये काही दहशतवादी ठार झाले आहेत.

चकमक अद्यापही सुरुच
या परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलातील जवान यांच्यामध्ये चकमक सुरुच आहे. जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये काही दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र, ठार झालेल्या दहशतवाद्यांचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याने दहशतवाद्यांचा नेमका आकडा काय आहे, याची माहिती पोलिसांनी दिली नाही.