पुलवामामध्ये चकमक ; ३ दहशवाद्यांचा खात्मा, १ जवान शहिद

पुलवामा : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशीरा चकमक झाली. या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले तकर १ जवान शहिद झाला असून अजून २ जवान जखमी आहेत. तर सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहिम सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुंछ, नौशेरा पुलवामा सेक्टमध्ये दहशतवाद्यांकडून कुरापती सुरु आहेत. पुलवामाच्या दलीपुरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि लष्करी जवानांच्या संयुक्त पथकाने सोध मोहिम सुरु केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. तेव्हा २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आला. यावेळी एक जवान आणि एक नागरिक जखमी झाला होता. उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला. तर आणखी एक दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचाही खात्मा करण्यात आला. तर आणखी २ जवान या घटनेत जखमी झाले आहेत. तर परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Loading...
You might also like