गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये चकमक, पोलिस अधिकाऱ्याने गोळी झाडली

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन

यवतमाळ शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गुंड दीपक उर्फ भैय्या यादव याच्यावर देविदास उर्फ देवा चव्हाण याने प्राणघातक हल्ला केला. यावेळी तेथे आपल्या पथकासह पोहचलेल्या पोलिस अधिकाऱ्याने हा प्रकार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांवर हल्ला करण्याचा गुंडांनी प्रयत्न केला. यावेळी पोलीस अधिकारी मनवर यांनी गुंड देवा याच्यावर गोळी झाडली. यात तो जखमी झाला. अवडवाडी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या लोहारा येथील हॉटेल हॉलिडे इनजवळ ही घटना घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff3033de-bfa8-11e8-8d43-9de2e09b94f7′]

लोहारा परिसरातील सराईत गुन्हेगार दीपक उर्फ भैय्या यादव गुन्हेगारी करून लोहारा भागात वर्चस्व निर्माण करीत होता. या वर्चस्वावरून अन्य गुंडांबरोबर त्याचा वाद होत होता. देविदास उर्फ देवा चव्हाण याच्यासोबत त्याचा व्यवसायिक संघर्ष सुरु झाला. संघर्षात याआधी देवाला भैय्या यादवने मारहाणही केली होती. याचाच वचपा काढण्यासाठी देवाने आपल्या साथीदारांच्या मदतीने भैय्याचा शेवट करण्याचे ठरवले होते. गुंड दीपक उर्फ भैय्या यादव सकाळी साडेअकरा वाजता देवीनगर भागातून दुचाकीने एकटा जात असता देवा याने ३ साथीदारांना सोबत घेऊन भैय्या यादववर हल्ला केला. चेहऱ्याला गुलाल लावून  हॉटेल हॉलिडे जवळ त्याच्यावर कोयत्याने वर्मी घाव घालण्यास सुरुवात केली. याचवेळी तेथून टोळीविरोधी पथकाचे प्रमुख संतोष मनवर हे ३ कर्मचाऱ्यांसह जात होते. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी पोलीस अधिकाऱ्याकडे मोर्चा वळवीत संतोष मनवर यांच्यावर हल्ला केला. परंतुख संतोष मनवर हे थोडक्यात बचावले.

राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले

त्यांनी आत्मसंरक्षणासाठी त्यांच्या रिव्हॉल्वरने हल्लेखोरावर एक राऊंड फायर केला. हल्लेखोर देवा याच्या छातीत गोळी लागली. मनवर यांनी जखमी आरोपी देवा चव्हाण, राम्या उर्फ रामेश्वर राठोड या दोघांना ताब्यात घेतले. जखमी भैय्या यादव, देवा चव्हाण या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. यातील घटनास्थळाहुन फरार झालेला आरोपी आकाश नेवारे याला अवधूतवाडी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी भैय्या यादवच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी देविदास उर्फ देवा चव्हाण, आकाश नेवारे, रामेश्वर राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. संतोष मनवर यांनी याआधीही आर्णी येथे अशाच पद्धतीने खून प्रकरणातील आरोपीला पकडताना आरोपीने हल्ला केल्यावर आत्मसंरक्षणासाठी गोळी झाडली होती. त्यात आज अशीच घटना घडल्याने त्याच्याया धाडसाचे कौतूक होत आहे. असे असले तरी त्यांना वरिष्ठांना  जवाब देताना नाकी नऊ येणार आहेत.