नालासोपारामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा पराभव

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – नालासोपारा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि बविआमध्ये  थेट लढत झाली. या ठिकाणी शिवसेनेच्या तिकिटावर माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी निवडणूक लढवली होती तर बविआच्या क्षितीज ठाकूर यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये क्षितीज ठाकूर यांनी 34267 इतक्या मतांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला आहे.  दोघांमध्ये  झालेल्या तुल्यबळ लढतीत अखेर क्षितिज ठाकूर यांनी विजय मिळवला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रदीप शर्मा यांनी या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. त्याचबरोबर या मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेलेल्या क्षितीज ठाकूर यांनी देखील याठिकाणी जोर लावत चांगली लढत दिली होती. मात्र अखेर या लढतीत क्षितिज  यांचा विजय झाला.  या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांना 74529 इतकी मते मिळाली असून क्षितिज ठाकूर यांना 108796 मते मिळाली आहेत. गुंडगिरी संपवण्यासाठी  मैदानात उतरलेल्या प्रदीप शर्मा यांना या पराभवामुळे चांगलाच झटका बसला आहे.

उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

1) प्रदीप शर्मा (शिवसेना ) – 74529
2) क्षितिज ठाकूर  (बहुजन विकास आघाडी ) – 108796 विजयी झालेले उमेदवार 
3) प्रवीण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी )-2691
4) हितेश राऊत (संघर्ष सेना)- 1154
5) परेश घटल (अपक्ष)-925
6) सलमान बलूच (बसप )-922
7) नोटा -2777

टीप : मतदानाची आकडेवारी हि निवडणूक आयोगाच्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com