प्रदीप शर्माविरोधात NIA चे कोर्टात गंभीर आरोप, जाणून घ्या काय झालं कोर्टात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी (Mansukh Hiren Death Case) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA ) रडारवर असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) यांना अखेर गुरुवारी (दि. 17) अटक झाली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. NIA ने कोर्टात शर्मा यांच्या 14 दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने 11 दिवसांची NIA कोठडी सुनावली आहे. शर्माच्या अटकेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

NIA ने न्यायालयात शर्मा यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
मनसुख हिरेन यांची हत्या प्रदीप शर्मा आणी सचिन वाझे यांच्या आदेशाने झाली आहे हे अटक केलेल्या आरोपींनी कबूल केल्याचा दावा NIA ने केला आहे.
तसेच कारमायकल रोडवरील एक्सप्लोझिव्ह प्रकरणात वाझे याच्यासोबत प्रदीप शर्मा यांचाही सहभाग होता.
धक्कादायक म्हणजे हिरेन यांच्या मारेकऱ्यांना या दोघांनीही मोठी रक्कम दिल्याचा दावाही NIA ने केला आहे.
दरम्यान शर्मांच्या वकिलांनी NIA ने कोर्टात केलेले सगळे आरोप फेटाळले आहेत.
NIA ने गुरुवारी (दि. 17) सकाळी शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर छापे टाकले.
त्यांना NIA ने लोणावळ्यातून ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
त्यानंतर दुपारी शर्मांना अटक झाली.
शर्मा यांच्यासोबत मनीष वसंत सोनी आणि सतीश यांना देखील अटक झाली आहे.

Extortion Case | खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण, 7 जणांची टोळी गजाआड

दरम्यान मनसुख हिरेन आणि कार मायकल रोड प्रकरणी शर्मा यांची चौकशी झाली होती.
पण एनआयएच्या ते कायम रडारवर होते. दोन दिवसांपूर्वीच NIA ने संतोष आणि आनंद या दोघांना अटक केली होती.
दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून काही नवीन खुलासे झाले आहेत. त्यानंतर एनआयएच्या कारवाईला वेग आला अन् शर्मांना अटक झाली.

Wab Title : encounter specialist pradeep sharma has been remanded in nia custody for 11 days nia say about pradeep sharma

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Customer Alert Message | SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाचा मेसेज ! चुकूनही करू नका ‘ही’ 3 कामे, जाणून घ्या बँकेने काय म्हटले?

प्रक्षोभक ट्वीट ! अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटरविरोधात FIR दाखल